Shashikant Shinde, Mahesh Shinde satara reporter
पश्चिम महाराष्ट्र

महेश शिंदेंनी मारलं कोरेगावचं मैदान; शशिकांत शिंदेंचा सलग तिसरा पराभव

Nagar Panchayat Election Results : कोरेगावमध्ये शशिकांत शिंदेंचा गड खालसा

सरकारनामा ब्युरो

कोरेगाव : साताऱ्यातील कोरेगावचे शिवसेना आमदार महेश शिंदे (Mahesh Shinde) पुन्हा एकदा जायंटकिलर ठरले आहेत. कोरेगाव नगरपंचायतीमध्ये (Koregaon Nagar Panchayat Election Results) आमदार महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखालील कोरेगाव शहर विकास परिवर्तन पॅनेलने बाजी मारली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांना पराभवाचा जबरदस्त धक्का बसला आहे.

या निकालासह कोरेगाव नगरपंचायतीमध्ये आता सत्तांतर झाले आहे. आमदार महेश शिंदे यांच्या नेतृत्वातील कोरेगाव शहर विकास परिवर्तन पॅनेलने १७ पैकी १३ जागा मिळवत नगरपंचायतीव एकहाती वर्चस्व मिळवले आहे. तर राष्ट्रवादीच्या आमदार शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वातील पॅनेलला अवघ्या ४ जागा मिळवता आल्या आहेत.

नगरपंचायतीच्या १७ जागांसाठी ४० उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते. यात २१ डिसेंबर रोजी पहिल्या टप्प्यात १३ जागांसाठी व १८ डिसेंबर रोजी दुसऱ्या टप्प्यात ४ जागांसाठी मतदान पार पडले होते. त्यानंतर आज सकाळी १०:०० वा. डी. पी. भोसले महाविद्यालयाच्या इनडोअर स्टेडियम हॉलमध्ये मतमोजणी झाली. तासाभरातच सर्व १७ जागांचे निकाल जाहीर झाले. त्यानुसार आमदार महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखालील कोरेगाव शहर विकास परिवर्तन पॅनेलचे १३ उमेदवार विजयी झाले.

कोरेगाव नगरपंचायत निकालानंतर आमदार शशिकांत शिंदे यांना बसलेला हा पराभवाचा सलग तिसरा धक्का आहे. यापुर्वी २०१९ रोजी विधानसभा निवडणुकीत महेश शिंदे यांनी शशिकांत शिंदेंना पराभवाचा पहिला धक्का दिला. त्यानंतर गतवर्षी पार पडलेल्या जिल्हा बँक निवडणुकीत ज्ञानदेव रांजणे यांनी शशिकांत शिंदेंना अवघ्या १ मताने पराभव पाहायला लावला. आता कोरेगावमधील गेलेली सत्ता हा शशिकांत शिंदेंचा ३ वर्षात झालेला तिसरा पराभव आहे.

विजयी उमेदवारांची नावे :

कोरेगाव शहर विकास परिवर्तन पॅनेल - स्नेहल आवटे (प्रभाग क्रमांक एक), साईप्रसाद बर्गे (प्रभाग क्रमांक दोन), वनमाला बर्गे (प्रभाग क्रमांक तीन), दीपाली बर्गे (प्रभाग क्रमांक चार), सागर बर्गे (प्रभाग क्रमांक पाच), सागर वीरकर (प्रभाग क्रमांक सहा), राहुल बर्गे (प्रभाग क्रमांक सात), अर्चना बर्गे (प्रभाग क्रमांक आठ), राजेंद्र वैराट (प्रभाग क्रमांक १२), संगीता ओसवाल (प्रभाग क्रमांक १३), परशुराम बर्गे (प्रभाग क्रमांक १४), शीतल बर्गे (प्रभाग क्रमांक १५), सुनील बर्गे (प्रभाग क्रमांक १६).

राष्ट्रवादी काँग्रेस पॅनेल - संजीवनी बर्गे (प्रभाग क्रमांक नऊ), हेमंत बर्गे (प्रभाग क्रमांक दहा), प्रभावती बर्गे (प्रभाग क्रमांक ११), मोनिका धनावडे (प्रभाग क्रमांक १७).

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT