राणेंना धक्का; एका मताने गेली नगरपंचायत...काँग्रेसकडे जिल्ह्याचे लक्ष

सिंधुदुर्ग बँकेच्या निवडणुकीतील विजयानंतर भाजपला या नगरपालिकेतही बहुमत मिळण्याची अपेक्षा होती.
Vaibhav Naik, Narayan Rane
Vaibhav Naik, Narayan RaneSarkarnama

कुडाळ (जि. सिंधुदुर्ग) : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विजयाचा गुलाल उधळलेल्या केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना कुडाळमध्ये धक्का बसला आहे. ही नगरपंचायत (Nagar Panchayat Election) एका मताने त्यांच्या हातून निसटली असून काँग्रेस (Congress) किंगमेकरच्या भूमिकेत आहे. निवडणुकीत भाजपला (BJP) आठ, शिवसेनेला (Shiv Sena) सात तर काँग्रेसला दोन जागा मिळाल्या आहे. भाजपच्या एका उमेदवाराचा एका मताने पराभव झाला आहे. कुडाळमध्ये त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे. (Kudal Nagar Panchayat Election)

कुडाळ (Kudal) विधानसभा मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात असून वैभव नाईक (Vaibhav Naik) आमदार आहे. सिंधुदुर्ग बँकेत सत्ता मिळवल्यानंतर कुडाळ नगरपालिकेसाठीही राणे व नाईक यांच्यात जोरदार लढत होती. मागील निवडणुकीत भाजपला या नगरपंचायतीत नऊ जागा मिळाल्या होत्या. एकुण 17 जागा असलेल्या या नगरपालिकेत भाजपला पुन्हा हा जादुई आकडा गाठता आलेला नाही.

Vaibhav Naik, Narayan Rane
निफाडला अनिल कदमच बॅास; राष्ट्रवादीच्या आमदार दिलीप बनकरांना धक्का

भाजपला केवळ आठ जागा मिळाल्या असून कविलकट्टा येथील जागेवर भाजपचा एका मताने पराभव झाला आहे. या एका मतामुळे भाजपची सत्ता हातातून निसटली आहे. शिवसेनेकडे सात जागा आल्या आहेत. राज्यात एकत्र असलेल्या शिवसेना व काँग्रेसने स्वतंत्रपणे ही निवडणूक लढली. यामध्ये काँग्रेसला दोन जागांवर समाधान मानावे लागले. पण आता सत्तेत कोण बसणार, हे काँग्रेसच ठरवणार आहे. काँग्रेस कुणाला पाठिंबा देणार, यावर कुडाळचे भवितव्य ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Vaibhav Naik, Narayan Rane
रोहित पवारांचीच सरशी; राम शिंदे जवळपासही नाहीत

रोहित पाटलांनी मारली बाजी

कवठेमहांकाळ (जि. सांगली) : राज्याचे लक्ष लागलेल्या कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या निवडणुकीत रोहित आर. आर. पाटील यांनी बाजी मारली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनेलने 17 पैकी 10 जागांवर विजय मिळवत राजकारणात यशस्वी पदार्पण केलं आहे. रोहित पाटील यांची ही पहिली मोठी निवडणूक होती. त्यामुळे याकडे राष्ट्रवादीसह सर्वच राजकीय पक्षांचं लक्ष लागलं होतं.

या निवडणुकीत राष्ट्रवादीचा एक गटही त्यांच्या विरोधात आल्याची चर्चा होती. पण त्यांच्यावर मात करत रोहित यांनी नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकावला आहे. रोहित पाटील यांचं वय 23 असून त्यांनीच प्रचाराची धुरा सांभाळली होती. निष्ठावान कार्यकर्ते आपल्यासोबत असून मी 25 वर्षांचा होईपर्यंत कुणाला शिल्लक ठेवत नाही, असं वक्तव्य रोहित पोटील यांनी प्रचारादरम्यान केलं होतं.

Vaibhav Naik, Narayan Rane
मंत्री विश्वजित कदम यांना जबर धक्का; कडेगावमध्ये भाजपची सत्ता

मंत्री विश्वजित कदम यांना जबर धक्का

कडेगाव : राज्यमंत्री विश्वजित कदम (Vishwajeet Kadam) यांचे गाव असलेल्या कडेगावमध्ये भाजपने सत्ता काबीज केली आहे. त्यामुळे कदम यांना मोठा धक्का बसला आहे. या निवडणुकीत पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतंत्र पॅनेल टाकल्याने काँग्रेसचा पराभव झाल्याची चर्चा आहे. भाजपला 10 तर काँग्रेसला केवळ सहा जागा मिळाल्या आहेत.

नगरपंचायत पंचवार्षिक निवडणुकीत काँग्रेस भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस असा तिरंगी सामना झाला. पहिल्या टप्प्यातील १३ प्रभागातील मतदान प्रक्रिया २१ डिसेंबर रोजी पार पडली असून उर्वरित चार प्रभागासाठी मंगळवारी मतदान झाले. या निवडणुकीत प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेस येथे स्वतंत्र पॅनेल देत रंगत वाढवली होती. काँग्रेसपुढे सत्ता टिकवण्याचे तर भाजपा व राष्ट्रवादी सत्ता काबीज करण्याचे आव्हान होते. यामध्ये भाजपने बाजी मारली असून काँग्रेसला केवळ सहा जागांवर समाधान मानावे लागले आहे. राष्ट्रवादीच्या पॅनेलचा धुव्वा उडाला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com