-पांडुरंग बर्गे
Koregaon News : महाराष्ट्र विधीमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आमदार महेश शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी कोरेगाव शहर विकासासाठी तब्बल १६ कोटी निधी मंजूर केला आहे.
कोरेगाव शहरासाठी Koregaon वैशिष्ठ्यपूर्ण योजनेंतर्गत दहा कोटी, तर पुरवणी अर्थसंकल्पातून सहा कोटी रुपये निधी मंजूर झालेला आहे. दोनच दिवसांपूर्वी शहरात लक्ष्मीनगर येथे विकासकामांचा प्रारंभ करताना आगामी आठ महिन्यात कोरेगाव शहर पश्चिम महाराष्ट्रातील स्वच्छ, सुंदर आणि आदर्शवत असे शहर बनवणार असल्याचा शब्द दिला होता, तो आता खरा ठरत असून, निधीची तरतूद केली जात आहे,असे आमदार महेश शिंदे Mahesh Shinde यांनी सांगितले.
कोरेगाव शहराच्या सुंदरतेकडे विशेष लक्ष दिले जात असून सुशोभीकरणाला प्राधान्य दिले जात आहे. शहरामधून वाहणार्या तीळगंगा नदीचे बकाल स्वरूप बदलून तिचे मूळ अस्तित्व कायम ठेवत नदीपात्राचे सुशोभीकरण केले जाणार आहे. त्यासाठी वैशिष्ठ्यपूर्ण योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात पाच कोटी ४० लाख रुपये उपलब्ध झाले आहेत.
दत्तनगर व महादेवनगर या दोन वसाहती नवीन डिझाईनमधील पुलाने जोडल्या जाणार असून, दुतर्फा आकर्षक बागबगीचाही तयार केला जाणार आहे.सातारा- लातूर महामार्गाच्या रुंदीकरण व क्रॉंक्रीटीकरणामुळे साखळी पुलानजिकचे श्री मारुती मंदीर हे आता आतील बाजूस नदीकाठी स्थलांतरीत केले जाणार आहे. त्यासाठी महादेवनगरात नव्याने सभामंडप बांधण्यासाठी ४० लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.
महादेवनगर दहावा कट्टा ते साखळी पूल या दरम्यान दोन्ही बाजूने तीळगंगा नदीचे सुशोभिकरण पहिल्या टप्प्यात केले जाणार आहे. दोन्ही बाजूला मॉर्निंग वॉकिंग ट्रॅक, सुंदर बाग बगीचे, साकव पूल आणि महादेव नगर ते श्री केदारेश्वर मंदिर आणि दत्तनगर ते केदारेश्वर मंदिर असा मोठा दोन्ही बाजूने प्रशस्त रस्ता केला जाणार आहे.
आझाद चौक भाजीमंडई आणि व्यापारी संकुल दृष्टीक्षेपात असून, लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाणार आहे. या कामासाठी वाढीव निधी म्हणून चार कोटी ६० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. कोरेगाव -रहिमतपूर रस्त्याच्या चौपदरीकरणाबरोबरच पदपथासाठी सहा कोटी रुपये पुरवणी अर्थसंकल्पातून मंजूर करण्यात आले आहेत.
लोकप्रतिनिधींकडून धूळफेक
दरम्यान, मागील सत्ताधाऱ्यांच्या काळामध्ये तीळगंगा नदीच्या सुशोभीकरणाचा केवळ देखावा करण्यात आला. त्यामागे मोठे राजकारण झाले. तत्कालीन लोकप्रतिनिधींनी स्वयंस्फफूर्तीने काम न करता जलसंपदा विभागाच्या यंत्रसामुग्रीच्या आधारे काम दाखवून शहरवासियांच्या डोळ्यात धूळफफेक केली होती. या उलट आता तब्बल पाच कोटी रुपये निधी उपलब्ध झाला आहे, असा आरोपही आमदार महेश शिंदे यांच्यावतीने काढण्यात आलेल्या पत्रकात करण्यात आलेला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.