-राजेंद्र शिंदे
Khatav News : आमदार महेश शिंदे Mahesh Shinde यांचा खटाव येथील एका कार्यक्रमात पुन्हा एकदा साधेपणा अनुभवता आला. येथील आंबेडकर चौकात असलेल्या लक्ष्मीआई मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यात मंदिराच्या विश्वस्तांनी आमदारांना महाप्रसाद घेण्याचा आग्रह धरला. त्यावेळी आमदारांनी कसलेही आढेवेढे न घेता विश्वस्तांच्या शब्दाला मान देत पंगतीत जमिनीवर मांडी घालून बसून पत्रावळीमध्ये जेवण केले.
यावेळी त्यांच्या सोबत सरपंच नंदकुमार वायदंडे, बुध (ता.खटाव ) चे सरपंच अभय राजेघाटगे,राहुल पाटील,उपसरपंच दीपक घाडगे,दादा मोहिते,अमर देशमुख व इतर पदाधिकाऱ्यांनी जेवण केले. विशेष म्हणजे यावेळी कार्यकर्त्यांचा चेहऱ्यावर असलेला उत्साह खुलेपणाने दिसत होता.
यावेळी आमदारांनी चविष्ट भोजनाचे तोंडभरून कौतुक केले व यावेळी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत मनभरुन गप्पा मारल्या. कार्यकर्ते आपल्या नेत्याच्या इतक्याजवळ बसून मनातलं सारं काही बोलले. आपला नेता आपल्या मांडीला मांडी लावून जेवण करत आहे, ही बाब सर्व कार्यकर्त्यांसाठी उत्साह भरणारी होती.
यानिमित्ताने कार्यकर्त्यांना व भाविकांना आमदारांचा साधेपणा अनुभवता आला. यावेळी उपस्थित मंडळी भारावून गेले. यामुळे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आणखी जोमाने कामाला लागल्याचे दिसून आले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.