Makrand Patil And Sharad Pawar sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara NCP News : कालपर्यंत अजित दादांसोबत असलेले मकरंद पाटील आज पवारसाहेबांच्या गाडीत...

Sharad Pawar राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे सातारा जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर निरा नदीच्या तिरावर शिंदेवाडी (ता.खंडाळा ) येथे जंगी स्वागत करण्यात आले.

Umesh Bambare-Patil

Satara NCP News : अजित पवारांच्या निर्णयानंतर राष्ट्रवादी फुटली. त्यामुळे साहेब व दादा असे दोन गट निर्माण झाले. सातारा जिल्ह्यातील वाईचे आमदार मकरंद पाटील कालपर्यंत अजित पवार यांच्यासोबत होते. आज ते खासदार शरद पवार यांच्यासोबत गाडीत असल्याचे पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार sharad Pawar यांचे सातारा जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर निरा नदीच्या तिरावर शिंदेवाडी (ता.खंडाळा ) येथे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी खासदार शरद पवार, आमदार रोहित पवार व प्रतिभाताई पवार तसेच वाई खंडाळा - महाबळेश्वरचे आमदार मकरंद पाटील Makrand Patil हे सुद्धा सोबत असल्याचे पाहुन अनेकांच्या भुवया उंचावल्या.

अजित पवार यांच्या राजकीय बंडावेळी मकरंद पाटील यांचे नाव असल्याचे सांगण्यात आल्याने आज आमदार मकरंद पाटील हे शरद पवारच्या स्वागतासाठी असणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पण, मकरंद पाटील पवारसाहेब यांच्यागाडीतच असल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.

मकरंद पाटील हे अजित पवारांसोबत असल्याचे पाहुन वाई विधानसभा राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी आपली भुमिका ही जाहीर केली होती. आज ते खासदा शरद पवार सोबत पाहुन कार्यकर्त्यांची अडचण गोची झाली आहे .

दरम्यान शरद पवार यांचे पुष्पहार व प्रचंड घोषणाबाजी करून जिल्हाच्या प्रवेशव्दारावर स्वागत करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उदय कबुले, मनोज पवार,राजेंद्र तांबे , सरपंच रविराज दुधगावकर, उपसरपंच ताहेर काझी, हणमंतराव सांळुखे, अजय भोसले, आदेश भापकर,अमीर काझी सह कार्यकर्ते उपस्थित होते. यानंतर खंडाळा येथेही शरद पवार यांचे विजयराजे धमाळ व कार्यकर्त्यांनी पुष्पहार अर्पण करून जंगी स्वागत केले .

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT