Sharad Pawar Vs Ajit Pawar : राज्यातील राजकारणात रविवारी (ता. २ जुलै) मोठा भूकंप घडला आहे. भाजपने २०१९ नंतर पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांच्या माध्यमातून मोठी फूट पाडली आहे. २०१९ मध्ये फसलेला प्रयोग २०२३ मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण करून शरद पवार यांना मोठा धक्का दिला. यावेळी अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये जात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसवर आपला दावा सांगितला. राष्ट्रवादी काँग्रेसमधील सर्वाधिक आमदार आणि खासदार सोबत असल्याचा दावा अजित पवार यांनी केला आहे. (Latest Political News)
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षातील आमदार त्यांच्यासोबत असल्याचा दावा केला. तर दुसरीकडे शरद पवार यांनी कुणीही गेले तरी राज्यातील जनता माझ्यासोबत असल्याचा दावा केला. त्यानंतर मात्र शरद पवार म्हणाले की, "अनेक आमदार मला फोन करून संपर्क करून राष्ट्रवादी काँग्रेससोबत असल्याचे म्हटले आहे." त्यामुळे अजित पवार आणि शरद पवार यांच्यासोबत किती आमदार आहे. या दोघांपैकी नेमके कुणासोबत सर्वाधिक आमदार आहेत? संख्याबळ कोणाकडे जास्त आहे? याबाबत आमदारांच्या नावांबाबत कुठलीही स्पष्टता नाही. दरम्यान कोण कुणासोबत आहे, याची एक संभाव्य यादी समोर आली आहे.
ही यादी समोर आली असली तरी शरद पवार आणि अजित पवार यांनी कोणताही अधिकृत आकडा सांगितलेला नाही. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील दोन ते तीन दिवसात याबाबत सांगणार असल्याचं सांगितलं आहे. तर दुसरीकडे अजित पवारांनी आमच्याकडे सर्व आमदार असून तुम्ही काही काळजी करू नका असं म्हटलं आहे. त्यामुळे येत्या दोन ते तीन दिवसात संख्याबळ कोणासोबत जास्त आहे हे समोर येईल.
अजित पवार यांच्यासोबत असलेले आमदार
1) अजित पवार (बारामती)
2) छगन भुजबळ (येवला)
3) दिलीप वळसे पाटील (आंबेगाव)
4) हसन मुश्रीफ (कागल)
5) धनंजय मुंडे (परळी)
6) धर्मरावबाबा आत्राम (अहेरी)
7) माणिकराव कोकाटे (सिन्नर)
8) नरहरी झिरवाळ (दिंडोरी)
9) आदिती तटकरे (श्रीवर्धन)
10) दत्तात्रय भरणे (इंदापूर)
11) दौलत दरोडा (शहापूर)
12) शेखर निकम (चिपळूण)
13) सरोज अहिरे (देवळाली)
14) किरण लहाने (अकोले)
15) अशोक पवार (शिरूर)
16) संजय बनसोडे (उदगीर)
17) अनिल पाटील (अमळनेर)
18) सुनील टिंगरे (वडगाव शेरी)
19) निलेश लंके (पारनेर)
20) सुनील भुसारा (विक्रमगड)
21) अतुल बेनके (जुन्नर)
22) संग्राम जगताप (अहमदनगर)
23) आशुतोष काळे (कोपरगाव)
24) चेतन तुपे (हडपसर)
25) सुनील शेळके (मावळ)
26) अण्णा बनसोडे (पिंपरी)
27) दिलीप मोहिते (खेड आळंदी)
शरद पवार यांच्यासोबत असलेले आमदार
1) जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा)
2) राजेश टोपे (घनसावंगी)
3) अनिल देशमुख (काटोल)
4) जयंत पाटील (इस्लामपूर)
5) बाळासाहेब पाटील (अहमदपूर)
6) शामराव पाटील (कराड उत्तर)
7) प्रकाश सोळंके (माजलगाव)
8) राजेंद्र शिंगणे (सिंदखेड राजा)
9) नवाब मलिक (अणुशक्ती नगर)
10) प्राजक्त तनपुरे (राहुरी)
11) बाळासाहेब आजबे (आष्टी)
12) राजू कारेमोरे (तुमसर)
13) मनोहर चंद्रिकापुरे (अर्जुनी मोरगाव)
14) दीपक चव्हाण (फलटण)
15) अशोक पवार (शिरूर)
16) मकरंद जाधव (वाई)
17) चंद्रकांत नवघरे (बसमत)
18) इंद्रनील नाईक (पुसद)
19) मानसिंग नाईक (शिराळा)
20) नितीन पवार (कळवण)
21) रोहित पवार (कर्जत जामखेड)
22) राजेश पाटील (चंदगड)
23) सुमन पाटील (तासगाव कवठे महाकाळ)
24) दिलीपराव बनकर (निफाड)
25) यशवंत माने (मोहोळ)
26) बबनराव शिंदे (माढा)
27) संदीप क्षीरसागर (बीड)
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.