Sharad Pawar-Kiran Sathe-Ajit Pawar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur NCP : राष्ट्रवादीला महाराष्ट्रात नंबर वन बनविण्यासाठी अजितदादांना प्रदेशाध्यक्ष करा : सोलापूरच्या सरचिटणीसांचे पवारांना पत्र

सरकारनामा ब्यूरो

Solapur News : राष्ट्रवादी काँग्रेसमधील गटतट संपविण्यासाठी, पक्षाला राज्यात एक नंबरवर न्यायचे असेल आणि राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री करायचा असेल तर अजित पवार यांच्यासारखा स्पष्टवक्तेपणा असलेला नेता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी असणे गरजेचे आहे. त्यामुळे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे मी निवेदनाद्वारे अजित पवार यांना प्रदेशाध्यक्ष करण्याची विनंती केली आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी सांगितले. (Make Ajit Pawar state president of NCP: General Secretary Kiran Sathe's letter to Sharad Pawar)

साठे म्हणाले की, अजित पवार (Ajit Pawar) यांनी वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) संघटनेची जबाबदारी मागितली आहे. राष्ट्रवादी हा लोकशाही पद्धतीने चालणारा पक्ष आहे. अजितदादांनी केलेल्या मागणीला माझा सोलापूर (Solapur) जिल्ह्यातून पाठिंबा आहे. अजितदादांसारखा खमका प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादीला मिळणं, सध्या काळाची गरज आहे. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस एक नंबरवर न्यायचा असेल आणि राज्यात सर्वाधिक आमदार निवडून आणायचे असतील, तर अजित पवार यांच्या खांद्यावर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देणे गरजेचे आहे.

राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काम करत असताना सोलापूर जिल्ह्यात तो गटातटामध्ये विभागाला गेला आहे. जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमधील गटतट मिटविण्यामध्ये पक्षाच्या कोणत्याही वरिष्ठ नेत्याला यश आलेले नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला महाराष्ट्रात नंबर एकवर न्यायचं असेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मुख्यमंत्री करायचा असेल तर अजितदादांसारखा स्पष्टवक्ता असलेला नेता प्रदेशाध्यक्षपदी देणे गरजेचे आहे. त्यासाठी मी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याकडे एका निवेदनाद्वारे मागणी केली आहे, असे साठे यांनी नमूद केले.

किरण साठे म्हणाले की, अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी तत्काळ निवड करावी. हा पक्ष राज्यात नंबर एकचा बनविण्यासाठी अजितदादांना संधी द्यावी, अशी मागणी मी पवारसाहेबांकडे निवेदनाद्वारे केलेली आहे. सोलापूर जिल्ह्यातील पक्षाचे काही वरिष्ठ पदाधिकारी हे वरिष्ठ नेते आल्यानंतरच पुढे पुढे करतात. पक्षाचे काम तळागाळात कुठेही दिसून येत नाही. त्या मुळे असं पुढं पुढं करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना पदावरून हद्दपार करण्यासाठी आणि पक्षाचे काम प्रामाणिकपणे करणाऱ्या कार्यकर्त्याला संधी देण्यासाठी अजित पवार हेच एक नंबरचे प्रदेशाध्यक्ष होऊ शकतात, अशी माझे प्रामाणिक मत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT