Jaykumar Gore, Atul Bhosale sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Karad : कराड दक्षिणमधून अतुल भोसलेंनाच आमदार करा... जयकुमार गोरे

अतुल भोसले Atul Bhosale म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे CM Eknath Shinde व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadanvis याचे सरकार आले आहे. त्यामुळे विकास निधी व निर्णयाची अंमलबजावणी ठोस होत आहे.

सरकारनामा ब्युरो

काले : कराड दक्षिणमध्ये अतुल भोसले यांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांची मजबूत फळी आहे. त्यामुळे २०२४ मधील विधानसभा निवडणुकीत अतुल भोसले यांना आमदार करून पाठवा, असे आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे यांनी केले. त्यासह होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीवर भाजपच्या विचाराचे प्रतिनिधी व भाजपचाच झेंडा फडकविण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

काले (ता. कराड) येथील ग्रामपंचायतीच्या सभागृहात भाजप संवाद मेळावा झाला. आमदार गोरे म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्त देशात राष्ट्रपिता ते राष्ट्र नेता माध्यमातून गावोगावी अनेक कार्यक्रम राबवले जात आहे. पंतप्रधानांनी सर्व सामन्याचा विचार करत अनेक योजना राबविल्या आहेत.

सामान्य माणसाचे जीवनमान उंचावण्यासाठी भाजपचे प्रयत्न आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समितीवर आपल्या विचारांच्या लोकांना संधी मिळाली पाहिजे त्यातून प्रत्येक गावाचा विकास चौफेर झाला पाहिजे यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी मतभेद विसरून जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावेत. तसेच अतुल भोसले यांना येत्या निवडणुकीत आमदार करण्याचे आवाहन त्यांनी केले.

अतुल भोसले म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याचे सरकार आले आहे. त्यामुळे विकास निधी व निर्णयाची अंमलबजावणी ठोस होत आहे. देशाच्या विकासात अनेक धोरणे राबून आज देश उच्च पातळीवर पोचला आहे. केंद्राच्या माध्यमातून सामन्याच्या खात्यात वर्षाला सहा हजार मिळत आहेत. राज्य सरकारने सुद्धा यात भर घालत सहा हजार देण्याचे ठरवले आहे.

केंद्राच्या माध्यमातून सामन्याच्या खात्यात वर्षाला सहा हजार मिळत आहेत. राज्य सरकारने सुद्धा यात भर घालत सहा हजार देण्याचे ठरवले आहे. त्यामुळे वर्षाला प्रत्येकाच्या खात्यात बारा हजार रुपये जमा होणार आहेत. आज भाजपचे विचार सामान्य पर्यंत पोहचले जात आहेत. का ले जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या दोन्ही जागेवर भाजपचा उमेदवार निवडून येईल. त्यासाठी सर्वांनी मतभेद विसरून कामाला लागा. मागचे विरोधक आजचे मित्र बनवा.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT