Bribe Case sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Police Bribe Case : पोलिस ठाण्यात लाचखोरीचा प्रकार, उपाधीक्षकांच्या नावाने मागितली 25 लाखांची लाच; कारनामा करणाऱ्या हवालदारांवर गुन्हा दाखल

Solapur Malshiras Akluj Police Station Bribe Case : सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस येथील अकलूज पोलिस ठाण्यात तब्बल 25 लाखांची लाच मागितल्या प्रकार उघडकीस आला आहे.

सरकारनामा ब्युरो

Solapur Bribe Case News : सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस येथील अकलूज पोलिस ठाण्यात उपाधीक्षकांच्या नावाने तब्बल 25 लाखांची लाच मागितल्या प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दोन खासगी दलालांना अटक केली आहे. तर त्यांना पाच लाख ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.

तसेच या प्रकरणात दोन पोलिस हवालदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शुक्रवारी (ता. 28) दुपारी अडीचच्या सुमारास माळशिरस येथील पालखी महामार्गावरील पिलीव रोडच्या पुलाखाली, जानकर प्लॉटजवळ करण्यात आली. अशा पद्धतीने दोन पोलिस हवालदारांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याने पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे.

आबा सावळा वळकुंदे (वय 48, रा. वळकुंदे मळा, 61 फाटा, ता. माळशिरस) आणि महादेव पंढरी माने (वय 39, रा. मोटेवाडी, ता. माळशिरस) अशी पकडलेल्या खासगी दलालांची नावे आहेत. तर पोलिस हवालदार अनिल महादेव शिंदे (ब. नं. 1659, नेमणूक नातेपुते पोलिस ठाणे, सध्या उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय, अकलूज) आणि पोलिस हवालदार राहुल मारुती वाघ (माळशिरस पोलिस ठाणे) अशी गुन्हा दाखल केलेल्या पोलिस हवालदारांची नावे आहेत. वळकुंदे व माने यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या माहितीनुसार, तक्रारदाराने 21 ऑगस्ट रोजी तक्रार दिली होती की, त्यांच्या भावाविरुद्ध अकलूज पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती. या तक्रारीवरून गुन्हा दाखल न करण्यासाठी हवालदार अनिल शिंदे याने स्वतःसाठी व उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष वाळके यांच्या नावे लाच मागितली. शिंदे याने तब्बल 25 लाख रुपयांची मागणी केली.

तक्रारदाराने रक्कम देण्यास नकार दिल्यानंतर अकलूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्यानंतर शिंदे यांने खासगी व्यक्ती आबा वळकुंदे याच्या मोबाईलवरून तक्रारदाराशी संपर्क साधला. दाखल गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळवून देण्यासाठी आणि ‘पीसीपीएनडीटी’चे कलम न लावण्यासाठी तपास अधिकारी डीवायएसपी संतोष वाळके यांच्यासाठी 25 लाख रुपये, तर काम झाल्यानंतर स्वतःसाठी 5 लाख रुपये, अशी मागणी केल्याचे तक्रार दिली.

२७ ऑगस्ट रोजी वळकुंदे व माने यांनी तक्रारदाराच्या आई-वडिलांना अटक न करण्यासाठी व बीएनएसएस कलम 35 (3) अन्वये नोटीस देण्यासाठी डीवायएसपी संतोष वाळके यांच्यासाठी पाच लाख आणि पोलिस राहुल वाघ यांच्यासाठी 50 हजार, अशी एकूण 5 लाख 50 हजार रुपयांची मागणी केली. त्यानुसार दुसऱ्या दिवशी सापळा रचून दोघांना पकडण्यात आले. पण दोन्ही हवालदार पसार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT