Barshi Crime news Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Barshi Crime : बार्शीतील कला केंद्रात पुन्हा क्राईम; ‘आईकडून 20 लाख मागून घे; नाहीतर हातपाय तोडेन’, खंडणीसाठी मॅनेजरचे अपहरण

Barshi kidnapping Case : बार्शी तालुक्यात जामगाव आवटे येथे रेणुका कला केंद्राच्या व्यवस्थापकाचे अपहरण करून वीस लाख रुपयांची खंडणी मागितली. पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

प्रशांत काळे
  1. अपहरण व खंडणी प्रकरण – बार्शी तालुक्यातील रेणुका कला केंद्राचे व्यवस्थापक सूरज नवनाथ नाईकवाडी यांचे अपहरण करून २० लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली.

  2. गुन्ह्याची पद्धत – विशाल रणदिवे व इतर तिघांनी नाईकवाडी यांना जबरदस्तीने कारमध्ये बसवून, गळ्याला कोयता लावून व धमक्या देत आईकडून पैसे मागण्यास भाग पाडले.

  3. पोलिस कारवाई – नाईकवाडी यांच्या फिर्यादीनंतर विशाल रणदिवे सहित चौघांविरुद्ध बार्शी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

Barshi, 20 September : बार्शी तालुक्यातील सासुरे येथील मृत उपसरपंच गोविंद बर्गे आणि नर्तिका पूजा गायकवाड यांचे प्रकरण राज्यभर गाजत असतानाच, बार्शी शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर असणाऱ्या लातूर रस्त्यावरील जामगाव आवटे येथील रेणुका कला केंद्राच्या व्यवस्थापकाचे अपहरण करून वीस लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी बार्शी तालुका पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सासुरे येथील घटना ताजी असतानाच बार्शी तालुक्यात पुन्हा एकदा कला केंद्राच्या व्यवस्थापकाचे अपहरण झाल्याने खळबळ उडाली आहे.

रेणुका सांस्कृतिक कला केंद्राचे व्यवस्थापक सूरज नवनाथ नाईकवाडी (वय ३५, रा. मुळे प्लॉट, बार्शी Barshi) यांचे अपहरण करण्यात आले होते. त्यांच्या फिर्यादीवरून विशाल रणदिवे (रा. टिळक चौक, बार्शी) याच्यासह इतर तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना नुकतीच घडली आहे.

नाईकवाडी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, रेणुका कला केंद्राच्या प्रवेशद्वाराजवळ कारमधून विशाल रणदिवे याच्यासह तिघेजण आले. मला ढकलून जबरदस्तीने वाहनात बसवले, दरवाजा बंद करून कुर्डुवाडीच्या दिशेने वाहन घेण्यास चालकास सांगितले. गाडी खांडवीजवळ गेल्यानंतर गळ्याला कोयता लावून आईकडून २० लाख रुपये मागवून घे, नाहीतर हातपाय तोडतो, असे म्हणत मला मारहाण केली.

त्यानंतर पुढे शेंद्रीजवळ एका हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबलो, त्यावेळी ‘गप जेवायचे; अन्यथा खलास करीन,’ अशी धमकीही त्या चौघांनी दिली. त्या हॉटेलमध्ये रणदिवे याने मद्यप्राशन केले. हॉटेल चालक संपत अंधारे यांना खूण करून ‘आईला फोन करा,’ असे सांगितले. नंतर आमची कमल थिएटर येथे बैठक लावली.

रात्री एकच्या दरम्यान आईसह इतर काही जण थिएटरमध्ये आले. ‘पोलिसांत तक्रार करू नका, केली तर मी सुटल्यावर तुम्हाला ठार करीन’ अशी धमकी दिली. नाईकवाडी हे खासगी रुग्णालयात उपचार घेत असून इतर तिघांना पाहिल्यास ओळखतो, असे म्हटले आहे. सहायक पोलिस निरीक्षक दिलीप ढेरे तपास करीत आहेत.

प्र.1: अपहरण झालेल्या व्यक्तीचे नाव काय आहे?
उ. – सूरज नवनाथ नाईकवाडी.

प्र.2: अपहरणासाठी किती रुपयांची खंडणी मागण्यात आली?
उ. – २० लाख रुपये.

प्र.3: मुख्य आरोपी कोण आहे?
उ. – विशाल रणदिवे हा मुख्य आरोपी आहे.

प्र.4: तपासाची जबाबदारी कोणाकडे आहे?
उ. – सहायक पोलिस निरीक्षक दिलीप ढेरे यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT