Bazar Samiti Election : भावी आमदारांची विधानसभेआधीच परीक्षा; सोलापूर, बार्शी बाजार समितीची निवडणूक जाहीर

Solapur Politics : विधानसभा निवडणुकीमुळे बाजार समितीच्या निवडणुका पुढे ढकलल्या जातील, अशी शक्यता सर्वांनाच वाट होती. मात्र, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने स्थगिती उठविल्यामुळे विधानसभेच्या आधी कृषी उत्पन्न बाजार समितीचा आखाडा तापणार, हे स्पष्ट आहे.
Solapur, Barshi Bazar Samiti Election
Solapur, Barshi Bazar Samiti ElectionSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 05 October : विधानसभा निवडणुकीपूर्वीच सोलापूर जिल्ह्यातील बार्शी आणि सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा आखाडा तापणार आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने या दोन्ही बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार येत्या सोमवारपासून (ता. ७ ऑक्टोबर) उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे.

या दोन्ही बाजार समित्यांसाठी १० नोव्हेंबरला मतदान, तर ११ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे आमदार राजेंद्र राऊत आणि विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुख, दिलीप माने यांची विधानसभा निवडणुकीपूर्वीच परीक्षा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

पावसामुळे सहकारी संस्थाच्या निवडणुकीला स्थगिती देण्यात आली होती. मात्र, ३० सप्टेंबर रोजी स्थगिती उठविल्यानंतर राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने सोलापूर (Solapur), बार्शी (Barshi) बाजार समितीचा निवडणूक (Bazar Samiti Election) कार्यक्रम जाहीर केला आहे.

विधानसभा निवडणुकीमुळे (Assembly Election) बाजार समितीच्या निवडणुका पुढे ढकलल्या जातील, अशी शक्यता सर्वांनाच वाट होती. मात्र, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने स्थगिती उठविल्यामुळे विधानसभेच्या आधी कृषी उत्पन्न बाजार समितीचा (Bazar Samiti Election) आखाडा तापणार, हे स्पष्ट आहे.

सोलापूर आणि बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी ११ ऑक्टोंबरपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. त्यानंतर १४ ऑक्टोंबर रोजी अर्जांची छाननी होणार आहे. या दोन्ही बाजार समित्यांसाठी १० नोव्हेंबरला मतदान, तर ११ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.

पण, याचदरम्यान विधानसभेची निवडणूक जाहीर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया जैसे थे ठेवून विधानसभेची आचारसंहिता लागू होण्याची अंदाज वर्तविण्यात येत आहे.

Solapur, Barshi Bazar Samiti Election
Rahul Gandhi : भाषणाच्या सुरुवातीलाच राहुल गांधींनी मागितली माफी, म्हणाले,'शिवाजी महाराजांची मूर्ती...'

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक घेण्यात यावी, यासाठी तिघांनी न्यायालयात याचिका दाखल केल्याचे सांगण्यात येत आहे. या तीनपैकी एका याचिकेवर न्यायालयाने निवडणूक घेण्याचा आदेश दिल्यास ऐन विधानसभा निवडणुकीत बाजार समितीची रणधुमाळी सुरू होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने फटकारल्यास आपल्यावर कारवाई होईल, या भीतीमुळे प्राधिकरणाकडून बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्याचे सांगण्यात येत आहे.

Solapur, Barshi Bazar Samiti Election
Anil Sawant : तानाजी सावंतांच्या पुतण्याला आमदार करण्याची मंगळवेढा राष्ट्रवादीला भलतीच घाई!

आमदारकीच्या इच्छुकांची कसोटी

भावी आमदारांची परीक्षा या बाजार समितीच्या निवडणुकीत होणार आहे. कार्यकर्त्याना बाजार समितीच्या उमेदवारीचे आमिष दाखवून आमदारकीसाठी उपयोग करून घेता येणार आहे. पण एकाला संधी दिली तर दुसरा नाराज होण्याची शक्यताही यामध्ये आहे. उमेदवारी अर्ज मागे घेईपर्यंत (१४ ऑक्टोबर) विधानसभेची आचारसंहिता लागण्याची शक्यता तशी कमीच आहे, त्यामुळे विधानसभेआधी बाजार समितीचा आखाडा तापणार हे निश्चित आहे.

Edited By : Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com