Mangalvedha, 02 April : मंगळवेढा पंचायत समितीचे सभापती आणि उपसभापतींनी नुकताच पदभार स्वीकारला आहे. नव्या कारभाऱ्यांची निवड होण्यापूर्वी प्रशासनाने त्यांची दालने अद्ययावत करून घेतली. मात्र, पक्षनेत्याला अजून कार्यालय उपलब्ध करून दिली नसल्याचे पुढे आले आहे, त्यामुळे गटनेत्यांनी कुठे बसायचे, असा सवाल राजकीय वर्तुळात विचारला जात आहे.
कोविड काळापासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. तब्बल चार वर्षे नव्या लोकप्रतिनिधींसाठी प्रतीक्षा करावी लागली आहे, त्यामुळे मंगळवेढा पंचायत समिती सभापतींच्या दालनामध्ये पंचायत समितीच्या घरकुल विभागाचे कार्यालय थाटण्यात आले होते.
पक्षनेते असलेले नितीन पाटील यांचे कार्यालय कुलूप बंद ठेवण्यात आले होते. मात्र, दोन महिन्यांपूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या. त्यात भारतीय जनता पक्षाला आठपैकी सहा जागा मिळाल्या, त्यामुळे अपेक्षेप्रमाणे भारतीय जनता पक्षाचे सभापती आणि उपसभापती निवडले गेले आहेत.
सभापती आणि उपसभापती निवडीपूर्वी प्रशासनाने सभापतींचे दालन अद्ययावत करून घेतले होते. यापूर्वी सभापती व उपसभापती हे एकाच कार्यालयात असत आणि पक्षनेतेसाठी स्वतंत्र कार्यालय होते. मात्र, यंदा सभापती, उपसभापतींसाठी स्वतंत्र कार्यालय उपलब्ध करून दिले आहे. मात्र, पक्षनेतेपदासाठी अद्याप कार्यालय उपलब्ध केले नाही.
तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे रड्डे पंचायत समिती गणाचे सुरेश कांबळे यांना गटनेतेपद दिल्याचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. मात्र, अद्याप कार्यालय उपलब्ध करून दिले नाही. त्यामुळे पक्षनेत्याकडे येणाऱ्या नागरिकांनी नेमके कोणत्या कार्यालयात संपर्क साधावा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी विद्यमान गटविकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते वैद्यकीय रजेवर गेल्यामुळे प्रभारीचा पदभार गटविकास अधिकारी यांच्याकडे नुकताच देण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्याकडून या संदर्भातील अधिक माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.
....तर आंदोलन करणार : कांबळे
प्रशासनाने ज्याप्रमाणे सभापती व उपसभापतींना दालन उपलब्ध करून लोकप्रतिनिधीचा सन्मान केला आहे. परंपरेनुसार पक्षनेत्यांसाठी स्वतंत्र कार्यालय उपलब्ध करून द्यावे. प्रशासनाने जाणूनबजून कार्यालय उपलब्ध करून देण्याचे टाळले असेल तर त्या संदर्भात आंदोलन करावे लागेल, असा इशारा गटनेते सुरेश कांबळे यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.