Balraje Aware : लक्ष्मण हाके हा राजकीय दलाल; पुतळ्याला विरोध केल्यास रस्त्यावर कपडे काढून मारू : बाळराजे आवारेंचा इशारा

Anjangaon statue Issue : माढा पुतळा वादावरून बाळराजे आवारे पाटील यांनी लक्ष्मण हाके यांना इशारा दिला. त्यामुळे सामाजिक आणि राजकीय तणाव आणखी वाढल्याचे चित्र दिसत आहे.
Laxman Hake-Balraje Aware
Laxman Hake-Balraje AwareSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 02 April : ज्या कोणी माणसाने सकाळी नऊ वाजता येतो, असं सांगितलं होतं, त्या माणसाला माझं एवढंचं म्हणणं आहे की, बाबा तुझा जातीयवाद तुझ्याकडे ठेव. त्यानंतर जर तू शिवाजी महाराजांना विरोध केला तर तुला रस्त्यावर कपडे काढून मारले जाईल, असा इशारा बाळराजे आवारे पाटील यांनी नाव न घेता ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना दिला आहे.

माढा तालुक्यातील अंजनगाव (Anjangaon) येथील खेलोबा मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभाण्यात आला आहे, त्यावरून अंजनगावमध्ये वातावरण पेटले आहे. पोलिसांनी बुधवारी लाठीचार्ज केला हेाता. त्यामुळे वातावरण अधिकच तणावपूर्ण झाले आहे.

बाळराजे आवारे म्हणाले, अंजनगाव खेलोबा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळ्याचा विषय आपण शांततेच्या मार्गाने सोडवू, असं माझं प्रशासन आणि शिवप्रेमींना आवाहन आहे. पण पोलिसांकडून लाठीचार्ज झालेली घटना अत्यंत चुकीची आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविल्यानंतर एवढी आक्रमक भूमिका घेण्याची काही गरज नव्हती. ही जागा खेलोबा मंदिराची आहे की बीएंडसीची आहे, याचा पुरावा असलेला ७/१२ उतारा आमच्याकडे आहे.

ही जागा मंदिराची नाही. जरी ही जागा मंदिराची असली तरी आज महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांमुळेच मंदिरावरील कळस आणि दारावरील तुळस आहे. त्यामुळे कुठल्याही मंदिराने, धर्माने आणि जातीने शिवाजी महाराजांना विरोध करायचे कारण नाही, असेही आवारे यांनी म्हटले आहे.

Laxman Hake-Balraje Aware
Anjangaon Statue : अंजनगावातील पुतळा आमदार अभिजीत पाटलांनी स्थलांतरित होऊ दिला नाही : लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप

आम्ही कुठल्या आमदार किंवा नेत्याच्या सांगण्यावरून काम करत नाही. आम्ही आतापर्यंत शिवाजी महाराज, अहिल्यादेवी होळकर, अण्णाभाऊ साठे यांचे २७० पुतळे आम्ही बसविले आहेत. ज्याठिकाणी परवानगी मिळाली आहे, तिथं परवानगी घेऊन, तर जिथं परवानगी मिळालेली नाही, त्या ठिकाणी विना परवानगीने पुतळे बसविले आहेत, असेही आवारे यांनी म्हटले आहे.

आवारे म्हणाले, फक्त चार लोकांनी हा वाद निर्माण केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आहेत आणि त्यांचे पुतळे आम्ही विना परवानगीनेच बसवणार, हे मी ऑन कॅमेरा सांगतो. आम्ही यापुढेही असे पुतळे बसविणार आहोत.

Laxman Hake-Balraje Aware
Pune ZP : पुणे जिल्हा परिषदेत अंकिता पाटलांना मोठी जबाबदारी : अजितदादांनंतर सुनेत्राताईंचंही हर्षवर्धन पाटलांना राजकीय बळ

लक्ष्मण हाके राजकीय दलाल आहे. धनगर समाजाला आमच्यामुळे त्रास झालेला नाही, आम्ही अहिल्यादेवी होळकरांचे स्मारक बसवलेले आहे. त्यांचे विचार आम्ही जपलेले आहे, त्यामुळे हाकेंनी आम्हाला काही सांगू नये, असेही आवारे यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com