Mangesh Chivate Eknath Shinde Pune Teachers’ Constituency sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Pune Teachers Mla Candidature : पुणे शिक्षक मतदारसंघातून उमेदवार जाहीर, एकनाथ शिंदेंचा विश्वासू शिलेदार मैदानात; फडणवीस, पवारांचा पाठींबा?

Mangesh Chivate Shiv Sena : पुणे शिक्षक मतदारसंघातून एकनाथ शिंदेंचे विश्वासू शिलेदार निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या देखील त्यांच्या उमेदवारीबाबत सकारात्मक असल्याचे ते म्हणाले.

Roshan More

Mangesh Chivate News : पुणे शिक्षक मतदारसंघातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वासू शिलेदार निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे. शिंदे मुख्यमंत्री असतान त्यांचे ओएसडी म्हणून काम पाहणारे तसेच सध्या शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख म्हणून कार्यरत असणारे मंगेश चिवटे हे पुणे शिक्षक परिषद मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. त्यांच्या उमेदवारीबाबत घोषणा त्यांनी केली आहे.

चिवटे यांनी सांगितले की, 6 सप्टेंबर रोजी मुख्याध्यापक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. त्याच दिवशी आपल्या प्रचाराचा नारळ फुटणार आहे. असल्याची माहिती मंगेश चिवटे यांनी पत्रकार परिषदमध्ये दिली.

या मतदारसंघातून आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांची भेट घेतली असून ते आपल्या उमेदवारीबाबत सकारात्मक आहेत. त्यामुळे येत्या 6 सप्टेंबर रोजी होणाऱ्या मेळाव्यात महायुतीचे खासदार, मंत्री आणि आमदार यांच्या उपस्थितीत प्रचार शुभारंभ होणार असल्याची माहिती चिवटे यांनी दिली.

पुणे शिक्षक विधान परिषद मतदारसंघातील निवडणूक नोव्हेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांच्या तयारीला वेग आला आहे. नुकतेच स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष कौस्तुभ गावडे यांना पुणे येथे महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडी कडून उमेदवारी मिळवली.

शिक्षक संघटनेचा पाठींबा

एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेनेने मंगेश चिवटे यांना पाठिंबा देत संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. डॉ. बापूसाहेब अडसूळ यांनी उमेदवारी जाहीर केली.या संघटनेचे राज्यात २३ हजार शिक्षक सदस्य असून, त्यांपैकी पुणे मतदारसंघात १५ हजार सदस्य असल्याची माहिती दिली.

रविवारी कोल्हापुरात आदर्श शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार वितरण कार्यक्रम पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धनंजय महाडिक, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार चंद्रदीप नरके, माजी खासदार संजय मंडलिक, माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांच्या उपस्थित होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT