Honey villege
Honey villege sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

महाबळेश्वर तालुक्यातील मांघर ठरले देशातील पहिले मधाचे गाव...

Umesh Bambare-Patil

मुंबई : राज्य शासनाच्या खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने नाविण्यपूर्ण उपक्रम म्हणून मधाचे गाव ही महत्वपूर्ण संकल्पना राबविण्यात येत आहे. यासाठी सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरनजीक असलेल्या मांघर गावाची निवड करण्यात आली आहे.

मांघर हे महाबळेश्वरपासून आठ किलोमीटर अंतरावर डोंगर कड्याखाली वसलेले गाव आहे. गावाच्या भोवताली घनदाट जंगल असून या ठिकाणी वर्षभर फुलोरा असतो. गावात सामूहिक मधमाशांचे संगोपन केले जाते. मधमाशांच्या परपरागीकरणामुळे पिकांची उत्पादकता वाढ झाल्याचे आढळून आले आहे. गावातील अंशी टक्के लोकसंख्या मधमाशापालनाचा व्यवसाय करतात.

मधाचे गाव या उपक्रमांतर्गत या गावात मधमाशांची संख्या वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. या निमित्ताने महाबळेश्वराला येणाऱ्या पर्यटकांना व ग्राहकांना शुद्ध व दर्जेदार मध मिळणार आहे. मधाचे गाव हे निसर्गाचे संरक्षण, संवर्धन करण्याबरोबरच डोंगराळ व जंगली भागात राहणाऱ्या लोकांसाठी कायम स्वरुपी रोजगार निर्माण करणारा प्रकल्प ठरणार आहे.

निसर्गातील अन्न साखळीतील महत्वाचा घटक म्हणून मधमाशांकडे पाहिले जाते. मधमाशांच्यामुळे पिक उत्पादनात देखील भरघोस वाढ होत आहे.देशातील हा पहिलाच प्रकल्प असून राज्यातील इतर जिल्हात देखील हा प्रकल्प राबविला जाणार आहे. मधमाशा संवर्धनासोबत निसर्ग संवर्धनासाठी हा प्रकल्प उपयुक्त ठरेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT