सातारा जिल्हा बँकेची राष्ट्रीयकृत बँकांशी बरोबरी; सर्व कर्ज व्याजदरात केली कपात

कर्जाच्या व्याजदारात Loan Interest कपात केली असली तरी बॅंकेकडे असलेल्या ठेवींच्या Deposite व्याजदरात Interest कोणतीही कपात केलेली नसल्याचे डॉ. सरकाळे Rajendra Sarkarle यांनी सांगितले.
Dr. Rajendra Sarkale, Nitin Patil
Dr. Rajendra Sarkale, Nitin Patilsarkarnama

सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने शेतकरी, व्यापारी, व्यावसायिक व नोकरदार यांना डोळ्यासमोर ठेऊन बॅंकेच्या थेट ४७ कर्ज योजना व सोसायट्यामार्फत राबविल्या जाणाऱ्या ६८ कर्ज योजनांच्या व्याजदरात एक ते तीन टक्क्यांपर्यंत कपात केली आहे. राज्यातील ३१ सहकारी बॅंकांमध्ये सगळ्यात कमी कर्ज व्याजदर असणारी बॅंक ठरली असून राष्ट्रीयकृत बॅंकांशी बरोबरी करू लागली आहे. हा निर्णय एक मेपासून वितरीत होणाऱ्या नवीन कर्जांना लागू होणार असून या निर्णयामुळे बॅंकेवर १७ ते १८ कोटींचा बोजा पडणार आहे, अशी माहिती बॅंकेचे अध्यक्ष नितीन पाटील व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी दिली आहे.

यावेळी बॅंकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, संचालक प्रदिप विधाते, दत्तानाना ढमाळ, सौ. कांचन साळुंखे, सौ. ऋतुजा पाटील, सुरेश सावंत, लहुराज जाधव, रामभाऊ लेंभे यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हा बॅंकचे तब्बल सात लाखांवर कर्जदार सभासदांबरोबर वाटचाल करत असून आर्थिक विकासाचे चक्र अधिक गतीमान करुन समाजातील सर्व घटकांना सामावून घेऊन उद्याचा देशातील सर्वात प्रगतशील जिल्हा घडविण्याचा मानस बॅंकेने डोळ्यासमोर ठेऊन व्याज कपातीचा निर्णय घेतला आहे.

Dr. Rajendra Sarkale, Nitin Patil
सातारा जिल्हा बँक नाबार्डच्या 'उत्कृष्ट कार्यक्षमता' पुरस्काराने सन्मानित

नितीन पाटील व डॉ. सरकाळे म्हणाले, जिल्हा बॅंकेच्या थेट ४७ योजना व सोसायट्यामार्फत ६८ योजनांतून कर्जपुरवठा केला जातो. बॅंकेचा मुख्य ग्राहक हा शेतकरी असून त्यांना सुलभ व्याजदरात कर्ज पुरवठा उपलब्ध करुन देऊन विविध शेती व शेतीपूरक व्यवसयाची उभारणी करण्याच्या उद्देशाने बॅंकेच्या संचालक मंडळाने सर्व योजनांच्या माध्यमातून एक मे २०२२ पासूनच्या कर्ज वाटपावरील व्याजदरात एक ते तीन टक्क्यांपर्यत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

Dr. Rajendra Sarkale, Nitin Patil
सातारा आणि पुणे जिल्हा बॅंकेचा पॅटर्न आता राज्यातही

फळबाग, फुलशेती लागवड, उपसा जलसिंचन, ठिबक, तुषार सिंचन सारख्या शेती उत्पादन वाढ करुन देणाऱ्या उत्पादक कर्ज योजनांसाठी सभासदांना साडे दहा टक्के तर शेतकरी निवास, सर्वसामान्य कर्ज योजनेसारख्या अनुउत्पादक कर्जासाठी अकरा टक्के व्याजदर लागू करण्यात आला आहे. क्षारपड जमिन सुधारणा, शैक्ष्णिक कर्ज, संकरीत गाय, मुरा म्हैस, पंढरपुरी म्हैस मांसासाठी देशी कुकुटपालन,इलेक्ट्रिक मोटार व पाइपालाइन, शेळीपालन, पोल्ट्री, शेत जमीन खरेदी, कृषी पर्यटन, जमीन सुधारणा, रेशीम उद्योग यांना बॅंक पातळीवर साडे आठ टक्के तर संस्था पातळीवर साडे दहा टक्क्ये व्याजदराने कर्ज मिळणार आहे.

Dr. Rajendra Sarkale, Nitin Patil
कालपर्यंत शिवेंद्रसिंहराजेंची चर्चा, आज अध्यक्षपदी नितीन पाटील बिनविरोध...

तसेच सामान्य कर्ज, दुचारी वाहन कर्ज, सौर उर्जा सयंत्र खरेदी,ग्रामीण शौचालय, शेतकरी निवास दुरुस्ती, फ्लॅट, गाळा, प्लॉट खरेदी, आटा चक्की, चारचाकी वाहन कर्ज बॅंक पातळीवर नऊ टक्के तर संस्था पातळीवर अकरा टक्के व्याजदर असेल. साखर कारखान्यांना दिलेल्या कॅश क्रेडीट कर्जाची मार्च २०२२ अखेर ३० कोटींची येणे बाकी असून या पूर्वी या कर्जाचा व्याजदर ११.५० टक्के होता. त्यामध्ये दीड टक्का कपात करुन तो दहा टक्के केला आहे.

Dr. Rajendra Sarkale, Nitin Patil
आमदार गोरेंच्या अटकेसाठी राष्ट्रवादी आक्रमक; महेश तपासे घेणार सातारा एसपींची भेट...

मध्यम व दिर्घ मुदत कर्जासाठी दहा टक्के, बॅंकेच्या कर्जदार मार्केटींग संस्था, ग्राहक संघ, प्रक्रिया संस्था व पाणी पुरवठा संसथा यांना भांडवलाकरिता कॅश क्रेडिट कर्ज पुरवठा केला जातो. त्यासाठी कर्जाव्याजदरात दोन टक्के कपात करुन तो दहा टक्के केला आहे. विकास सेवा सोसयट्यांना दहा टक्के दराने कर्ज पुरवठा केला जाणार आहे. कर्जाच्या व्याजदारात कपात केली असली तरी बॅंकेकडे असलेल्या ठेवींच्या व्याजदरात कोणतीही कपात केलेली नसल्याचे डॉ. सरकाळे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com