Manoj Jarange Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Manoj Jarange News : '...अन्यथा शेवटचा पर्याय म्हणून विधानसभेला सगळे उमेदवार पाडावे लागतील !'; जरांगेंचे मोठे संकेत

Maratha Reservation News : शांतता रॅलीला सुरुवात झाल्यानंतर शहरातील प्रमुख मार्गावरून ही रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आली. येथे झालेल्या सभेत मराठा समाज बांधवांनी मोठी गर्दी केली होती.

Rahul Gadkar

Kolhapur News : मराठा आरक्षणासंदर्भात शुक्रवारी मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. मिरजकर तिकटी येथून शांतता रॅलीला सुरुवात झाल्यानंतर शहरातील प्रमुख मार्गावरून ही रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आली. येथे झालेल्या सभेत मराठा समाज बांधवांनी मोठी गर्दी केली होती.

यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी सरकारसह विरोधकांनाही धारेवर धरले. सरकारला आता गोडीने सांगतोय, मराठा समाजाला आरक्षण द्यावे. नाहीतर शेवटचा पर्याय म्हणून विधानसभेला सगळे उमेदवार पाडावे लागतील, असा इशारा थेट राज्य सरकारला दिला. ( Manoj Jarange News)

आगामी निवडणुकीचा मुद्दा घेऊन आणि मराठा आरक्षणाची मागणी करत मनोज जरांगे यांनी कोल्हापुरात शुक्रवारी शेलक्या शब्दात राज्य सरकारसह विरोधकांचा समाचार घेतला. सरकारला आता विनंती करून सांगतो. नाहीतर सगळे उमेदवार विधानसभा निवडणुकीत पडतील.

महापुराचा फटका कोल्हापूरला बसला. काल केशवराव भोसले नाट्यगृहाला आग लागली. आग लागली की लावली असा प्रश्न आहे? असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी केला. अलमट्टी धरणाच्या पाण्यामुळे शेती उद्धवस्त होणार असेल तर काही तरी केले पाहिजे. आरक्षणाचा प्रश्न मिटला की ज्यामुळे पिकं उद्धवस्त त्याकडे जरा बघू. सत्ताधारी बरोबर आता विरोधकही माझ्या मागे लागले आहेत, अशी टीका त्यांनी केली.

मी काय चूक केली कळत नाही. त्यांना त्यांचे पक्ष वाढवायचे आहेत, मला माझ्या समाजाला आरक्षण द्यायचे आहे. मला राजकारणात यायचे नाही पण मराठा समाजाला देत नाहीत म्हटल्यावर काय करायचे. समाजाला आरक्षण द्या, आम्ही राजकारणात येत नाही. एकदा आरक्षण देईपर्यंत मुलासाठी समाजाच्या बाजूने उभा रहा. मी हार मानत नाही तुम्ही हार मानायची नाही, असे आवाहन करत मनोज जरांगें पाटील यांनी राजर्षी शाहू महाराज यांनी देखील मराठा समाजाला आरक्षण दिले होते ते आरक्षण पुन्हा द्यायचे आहे, असे स्पष्ट केले.

नाट्यगृहाच्या घटनास्थळाची केली पाहणी

दरम्यान, सभेपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी संगीत सूर्य केशवराव नाट्यगृह यांच्या घटनास्थळाची पाहणी केली. छत्रपती राजश्री शाहू महाराज यांनी उभी केलेली इमारत डोळ्या देखत हा आगीत भस्मसात होते हे दुर्दैवी आहे. ही वास्तू उभारण्यासाठी सरकारने सर्वतोपरी मदत करावी. या वास्तूला आग लावली का लागली हे पाहणे देखील महत्त्वाचे आहे, असेही जरांगे पाटील म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT