Maratha Reservation Nitesh Rane  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Maratha Reservation:'बाजारात चार आणे अन् राजकारणात राणे'; आंदोलकांचे राणेंना प्रत्युत्तर

Nitesh Rane : नीतेश राणेंच्या पोस्टरला जोडे मारून पोस्टर गाढवाला बांधून सोडून देत निषेध नोंदवला.

Mangesh Mahale

Sangli : "तुमची स्क्रिप्ट कुठून लिहून येते आहे? असा प्रश्न मनोज जरांगे पाटलांना विचारणारे भाजपचे आमदार नीतेश राणेंना मराठा आंदोलकांनी प्रत्युत्तर देत निषेध केला आहे. जरांगेंच्या उपोषणावरच शंका घेत राणेंनी त्यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर राज्यभरातील मराठा समाजात नाराजी आहे.

मनोज जरांगे-पाटलांच्या बाबतीत नीतेश राणे यांच्याकडून करण्यात आलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून सांगलीमध्ये मराठा समाजाकडून आंदोलन करण्यात आले. या वेळी संतप्त आंदोलकांनी नीतेश राणेंच्या पोस्टरला जोडे मारून पोस्टर गाढवाला बांधून सोडून देत निषेध नोंदवला.

राणेंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सांगलीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर संतप्त मराठा समाजाकडून आंदोलन करण्यात आले. "बाजारात चार आणे आणि राजकारणात राणे यांना आता कवडीची किंमत नाही. नीतेश राणेंची मराठा समाजात काय किंमत आहे, ते गरजवंत मराठा समाजापुढे एकटे येऊन बघावे," असे आव्हान मराठा आंदोलकांनी केले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राणेंनी दोन दिवसांपूर्वी जरांगे यांच्यावर सडकून टीका केली होती. "तुमची स्क्रिप्ट कुठून लिहून येते आहे? असा प्रश्न विचारत जरांगेंच्या हेतूंवरच शंका घेतली. यानंतर जरांगेंनी राणेंना प्रत्युत्तर दिलं होतं.

“आता नीतेश राणेंनी बोलू नये अशी माझी इच्छा आहे. एकीकडे ते मला फोन करून गोडगोड बोलतात आणि दुसरीकडे असं बोलतात. यापुढे मला त्यांच्याशी काहीही बोलायचं नाही. त्यामुळे त्यांनी यापुढे बोलू नये,” असे जरांगे म्हणाले.

नीतेश राणे काय म्हणाले होते?

ज्या समाजकंटकांनी आंदोलनाला बदनाम केलं, लोकांची व आमदारांची घरं पेटवली, तोडफोड केली, कायदा सुव्यवस्था हातात घेतली त्याविरुद्ध उपमुख्यमंत्री व गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी अतिशय कडक भूमिका घेतली. त्याला समर्थन करण्याऐवजी जरांगे पाटलांनी फडणवीसांवर टीका केली. पहिल्या दिवसापासून शांततेची भाषा करणारे मनोज जरांगे आता राजकीय बोलू लागले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT