Kolhapur News : मंगळवारी विभागीय सहसंचालकांनी (साखर)श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर अर्थात बिद्री कारखान्याचे लेखापरीक्षणाचे आदेश दिल्यानंतर चार तीन विधानसभा मतदारसंघ आणि चार-ते पाच तालुक्यांतील वातावरण तापले आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
सत्तेचा गैरवापर करत आमदार प्रकाश आबिटकर यांनी चुकीची माहिती देत प्रशासनाकडून चुकीचं काम करून घेत आहेत, अशी टीका बिद्रीचे चेअरमन व माजी आमदार के. पी. पाटील यांनी टीका केली आहे. निवडणुकीपूर्वीच लेखापरीक्षणाचे आदेश मिळाल्यानंतर बिद्रीचे राजकारण आता चांगलंच तापलं आहे. त्यामुळे आज तणावपूर्ण वातावरणात बिद्री निवडणुकीचे अर्ज छाननी पार पडण्याची शक्यता आहे. आज कोल्हापुरातील भूविकास बँक परिसरात अर्ज छाननी प्रक्रिया होणार आहे. त्यामुळे या छाननीत कोणाचा पत्ता कट होणार? कोणाचा राजकीय गेम केला जाणार? यांची चर्चा आता रंगू लागली आहे.
बुधवारी अर्ज भरण्याच्या आज अखेरच्या दिवशी १२५ उमेदवारांनी ७२ दुबार अर्जांसह १९७ अर्ज भरले. आजअखेर ६६७ उमेदवारांनी १९५ दुबार अर्जांसह एकूण ८६२ अर्ज निवडणूक विभागाकडे दाखल केले आहेत. महिला गटात सर्वाधिक २३५ अर्ज आले आहेत तर सर्वात कमी २७ अर्ज भटक्या विमुक्त जाती गटातून दाखल झाले. गुरुवारी आज अर्जांची छाननी होणार असून शुक्रवारी वैध अर्जांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
अर्ज माघारीसाठी ३ ते १७ नोव्हेंबरपर्यंत मुदत आहे. या वेळीही दुरंगीच लढत होणार असून, राष्ट्रवादी विरुद्ध शिंदे सेना असा थेट सामना होईल. भाजप, काँग्रेस, जनता दल, ठाकरे गट, स्वाभिमानी शेतकरी संघटना हे कोणत्या आघाडीत सामील होणार हे पाहणेही औत्सुक्याचे असेल. २० नोव्हेंबरला उमेदवारांना चिन्हांचे वाटप होईल. ३ डिसेंबरला मतदान होऊन ५ डिसेंबरला निवडणुकीचा फैसला होईल.
बुधवारी अखेरच्या दिवशी अर्ज भरलेल्यांमध्ये कारखान्याचे संचालक व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय.पाटील, राजेंद्र पाटील, सुनील सूर्यवंशी, जयश्री फराकटे, रणजितसिंह पाटील, विद्यमान संचालिका नीताराणी सूर्यवंशी, अर्जुन आबिटकर, विकास पाटील, संतोष ढवण यांचा समावेश आहे.
माजी पालकमंत्री सतेज पाटील यांनी बिद्रीच्या राजकारणात उडी घेतली आहे. दोन दिवसांपूर्वी कार्यकर्त्यांनी शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे . दरम्यान, सतेज पाटील गटाची बिद्रीच्या राजकारणात निर्णायक ताकद नसली तरी त्यांना मानणारा सभासद वर्ग या चार तालुक्यात आहे. बिद्रीच्या राजकारणात पालकमंत्री हसन मुश्रीफ हे आपले जवळचे मित्र म्हणजेच सतेज पाटील यांना सोबत घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे अर्ज माघारीनंतर खरे चित्र स्पष्ट होणार आहे.
Edited By : Mangesh Mahale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.