Manoj Jarange Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Video Manoj Jarange Patil : तासभर भाषण केल्यानंतर मनोज जरांगेंना भोवळ; साताऱ्यात नेमकं काय घडलं?

Shantata Rally At Satara : जरांगे पाटील यांना आशक्तपणा आहे. ते कंबरेला पट्टा बांधून आपली शांतता रॅली पार पाडत आहेत. प्रत्येक ठिकाणी ते तासभर भाषण करतात.

Sunil Balasaheb Dhumal

Maharashtra Political News : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीवर ठाम असलेले आंदोलक मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्र पिंजून काढण्यास सुरूवात केलेली आहे.

सध्या जरांगे यांची शांतता रॅली पश्चिम महाराष्ट्रात आहे. ते आज, शनिवारी साताऱ्यात आले होते. तेथे मराठा समाजाशी सुमारे तासभर संवाद साधला. आपले भाषण संपवताच जरांगे स्टेजवरच बसले. त्यांना भोवळ आल्याची माहिती आहे. त्यांचे हात थरथरत होते.

मराठा समाजाच्या आरक्षणावरून Maratha Reservation राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. आंदोलक जरांगे पाटील यांच्या ओबीसीतील आरक्षणाला ओबीसी नेत्यांनी प्रखर विरोध केला आहे. त्यानंतर राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असे वातावरण निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा वाद चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यावर जरांगे पाटील यांनी राज्यभर शांतता रॅली काढली आहे.

शांतता रॅलीच्या माध्यमातून जरांगे पाटील Manoj Jarange यांनी मराठवाड्यानंतर आता पश्चिम महाराष्ट्रातील समाजाशी संवाद साधत आहेत. सोलापूर, सांगली, कोल्हापूर येथे त्यांच्या सभा झाल्या आहेत. या सभांना लाखो लोक उपस्थित होते. त्यानुसार त्यांची शनिवारी सातारा येथे सभा झाली. यावेळी त्यांनी कंबरेला पट्टा बांधून सुमारे तासभर मराठा समाजाशी संवाद साधला. आपले भाषण संपताच ते पटकन आहे त्याच जागी बसले.

खाली बसलेल्या मनोज जरांगे यांचे हात खूप थरथरत होते. त्यांना अशक्तपणा आल्याचे जाणवत होते. त्यांच्या कंबरेला पट्टाही आहे. ते बसताच पदाधिकाऱ्यांनी त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. ते काहीही न बोलता काही वेळ फक्त बसून होते. त्यांच्यावर तात्काळ प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत. आता त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT