Ajit Pawar On Reservation : Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ajit Pawar News : जरांगे विरुद्ध भुजबळ वादावर अजित पवार बोलले, 'आरक्षण मागण्याचा सगळ्यांना अधिकार पण...'

Ajit Pawar On Reservation : आरक्षणाच्या प्रश्नावर भूमिका मांडताना माझ्यासकट सर्वच जणांनी आत्मपरीक्षण, आत्मचिंतन करणे गरजेचे

Chetan Zadpe

Sangli News : महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांना पुण्यतिथीनिमित्त आज (ता.२५) शनिवारी अभिवादन करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार कराड दौऱ्यावर आले आहेत. अजित पवार यांनी प्रीतिसंगम, कराड येथील समाधीस्थळावर पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. या वेळी त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. (Latest Marathi News)

अजित पवार म्हणाले, "विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात एकोपा निर्माण करून समाजकारण आणि राजकारण कसे करायचे, याची आदर्श मुहूर्तमेढ व शिकवण स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी घालून दिली. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी त्या काळात घेतलेले निर्णय आजही महत्त्वपूर्ण ठरतात. त्यांचे विचार, त्यांचे साहित्य हे आजही आपणा सर्वांसाठी मार्गदर्शक आहे."

मराठा आरक्षणासाठी लढा पुकारणारे मनोज जरांगे पाटील आणि अजित पवार गटाचे नेते मंत्री छगन भुजबळ यांच्यात मागील काही दिवसांत टोकाचे वादविवाद सुरू आहेत. मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षाचे चित्र दिसत आहे. यामुळे राज्यात दोन समाजात तेढ निर्माण होत आहे का? असा प्रश्न अजित पवारांना विचारला गेला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यावर भाष्य करताना अजित पवार म्हणाले, "कुणालाही टोकायचं माझा उद्देश नाही. आरक्षणाच्या प्रश्नावर भूमिका मांडताना माझ्यासकट सर्वच जणांनी आत्मपरीक्षण, आत्मचिंतन करणे गरजेचे आहे. राज्यात अनेक प्रश्न आहेत. प्रत्येकाला आरक्षण मागण्याचा अधिकार आहे. मात्र, आरक्षण देत असताना ते कायद्याच्या चौकटीत असलं पाहिजे, अशी भूमिका अजित पवारांनी मांडली.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT