Maratha Reservation : मनोज जरांगे पाटलांची पुण्यात जंगी सभा; मंत्री भुजबळांचा घेणार समाचार ?

Manoj Jarange Patil and Chhagan Bhujbal : जरांगे पाटलांनी पुन्हा महाराष्ट्र दौरा सुरू केला आहे.
Manoj Jarange Patil and Chhagan Bhujbal
Manoj Jarange Patil and Chhagan Bhujbal Sarkarnama
Published on
Updated on

Pune News: राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षण आणि धनगर आरक्षणाचा प्रश्न चांगलाच पेटला आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला 24 डिसेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. या अटीवर त्यांनी आपले उपोषण काही दिवसांसाठी स्थगित केले. यानंतर आता जरांगे पाटलांनी पुन्हा महाराष्ट्र दौरा सुरू केला आहे.

या दौऱ्यात पुण्यातील खराडी येथे 20 नोव्हेंबरला त्यांची मोठी सभा आयोजित करण्यात आली आहे. मात्र, मराठा समाजाला ओबीसीमधून कुणबी प्रमाणपत्र देण्यास विरोध करणारे मंत्री छगन भुजबळ त्यांच्या रडारवर असणार आहेत. या सभेत ओबीसी आणि मराठा समाजात वाद निर्माण करणाऱ्यांचा समाचार मनोज जरांगे पाटील घेण्याची शक्यता आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Manoj Jarange Patil and Chhagan Bhujbal
Jarange Patil News : मराठ्यांच्या राजधानीत जरांगे पाटील गरजणार; साताऱ्यात शनिवारी सभा

मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटी येथे उपोषणाचे अस्त्र उगारून मनोज जरांगे पाटील यांनी दुसऱ्यांदा राज्य सरकारच्या शिष्टमंडळाला 24 डिसेंबरपर्यंतची मुदत दिली. यानंतर उपोषण थांबवून छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचार घेतले. यानंतर आता त्यांनी पुन्हा उर्वरित महाराष्ट्र दौऱ्याची आखणी केली आहे. 20 नोव्हेंबरला पुण्यातील खराडी येथील महालक्ष्मी लॉनमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी भव्य सभा पार पडणार आहे.

"मराठा आरक्षणाच्या मागणीला विरोध करणाऱ्यांचा डाव मोडून काढला पाहिजे, अनेक जिल्ह्यात कुणबी नोंदी सापडत आहेत. त्यामुळे राज्यातील जवळपास 35 ते 40 टक्के लोकांना प्रमाणपत्र मिळत आहे. मात्र, मराठा आरक्षणासाठी कोणी काय केलं ? हे आपण 24 डिसेंबरनंतर समाजासमोर मांडणार आहे", असे जरांगे पाटलांनी सांगितले आहे.

दरम्यान, छगन भुजबळ यांनी सरसकट कुणबी प्रमाणत्र देण्यास विरोध केल्यामुळे अनेकदा जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यात आरोप-प्रत्यारोप झाले. जरांगे पाटलांची अंतरवाली सराटीत 100 एकरात झालेल्या सभेवरून एवढे पैसे कुठून येतात? असा सवाल भुजबळांनी केला होता. त्यांच्या या विधानानंतर मराठा समाजाने नाराजी व्यक्त केली होती.

आता भुजबळांनी मराठा आरक्षणाच्या मागणीवर टीका करण्याचे थांबवले नाही, तर पुण्यात खराडी येथे होणाऱ्या सभेत मनोज जरांगे पाटील भुजबळांच्या टीकेचा खरपूस समाचार घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुण्यातील सभेत मनोज जरांगे पाटील काय बोलतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

Edited by : Ganesh Thombare

Manoj Jarange Patil and Chhagan Bhujbal
Satyajeet Tambe : आमदार तांबेंना अकोलकर वाड्यावर सापडला 'सुर्या'त लहानपणीचा सत्यजीत !

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com