Sangli News, 28 Aug : सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन मानसिंगराव नाईक यांचे स्वीय सहाय्यक (पीए) सतीश रामचंद्र पाटील (वय ५०, रा. कोल्हापूर) यांचा गुरुवारी झालेल्या भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला. कुपवाड-कौलपूर रस्त्यावर झील इंटरनॅशनल स्कूलसमोर हा अपघात झाल्याची माहिती आहे.
दुचाकी आणि ट्रॅक्टरमध्ये झालेल्या धडकेत पाटील गंभीर जखमी झाले आणि त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, सतीश पाटील हे दुचाकीवरून कुपवाड-कौलपूर रस्त्याने प्रवास करत होते. याचवेळी ट्रॅक्टर कोल्हापूरच्या दिशेने जात होता.
समोरून वाहन आल्याने पाटील गडबडले. त्याचवेळी त्यांच्या दुचाकीची ट्रॅक्टरला धडक झाली. धडक इतकी जोरदार होती की, सतीश पाटील हे रस्त्यावर जोरात आपटले. त्यांच्या डोक्याला आणि शरीराला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर घटनास्थळी काही काळ गर्दी झाली होती. घटनेची माहिती मिळताच कुपवाड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
अपघाताबाबतचा अधिक तपास कुपवाड पोलीस करत आहेत. सतीश पाटील हे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन मानसिंगराव नाईक यांचे स्वीय सहाय्यक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या अपघाती निधनाची बातमी समोर आल्यानंतर बँक तसेच त्यांच्या परिचितांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.