Gopichand Padalkar  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Gopichand Padalkar : मराठा आंदोलकांनी गोपीचंद पडळकरांची गाडी अडवली : पडळकर म्हणाले, ‘मराठा आरक्षणाला आमचा पाठिंबा; पण...’

Maratha protester intercepted Gopichand Padalkar's car : सोलापूरच्या कामती येथे मराठा आंदोलकांनी आमदार गोपीचंद पडळकरांची गाडी अडवली. पडळकरांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा असल्याचे सांगत चुकीच्या पद्धतीने खोडाखोड करण्यास विरोध असल्याचे स्पष्ट केले.

Vijaykumar Dudhale

Solapur, 05 September : सोलापूर जिल्हा पूर्व विभाग भाजपची बैठक आज अक्कलकोट येथे झाली. त्या बैठकीला निघालेले आमदार गोपीचंद पडळकर यांची गाडी आज (ता. 05 सप्टेंबर) सकाळी मराठा आंदोलकांनी सोलापूर-मिरज महामार्गावर मोहोळ तालुक्यातील कामती येथे अडवली. त्यावेळी आमदार पडळकर यांनी मराठा आरक्षणांसंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली. मराठा आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे. पण चुकीच्या पद्धतीने खोडाखोड करून, मागंपुढं काहीतरी लिहिणं, याला आमचा आक्षे आहे, असे पडळकर यांनी स्पष्ट केले.

पडळकर म्हणाले, राज्यातील मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात आज तुम्ही सोलापूर-मिरज महामार्गावर कामती येथे आंदोलन करत आहात. योगायोगाने पहिली गाडी माझीच अडविण्याची संधी तुम्हाला मिळाली आहे. मराठा आरक्षणांसंदर्भातील भूमिका आम्ही वेगवेगळ्या समाज माध्यमांमध्ये, व्यासपीठावर मांडली आहे. मराठा समाजाला एसईबीसीतून जे आरक्षण देण्यात आले आहे, त्याला आम्ही सातत्याने पाठिंबा दिलेला आहे.

ज्या मराठा बांधवांची कुणबी म्हणून नोंद आहे, त्या नोंदीच्या आधारे संबंधित मराठा बांधवांना आरक्षण मिळालं पाहिजे. परंतु काही चुकीच्या पद्धतीने खाडाखोड करणं, मागे-पुढे काहीतरी ओव्हररायटिंग करणं. त्या गोष्टींवर सर्वांचा आक्षेप आहे, तो तुमचाही असला पाहिजे, अशी अपेक्षा गोपीचंद पडळकर यांनी बोलून दाखवली.

आमदार पडळकर म्हणाले, ज्यांच्या मूळ नोंदी आहेत, त्या सर्वांना दाखला देण्यासंदर्भात कोणाचाही विरोध नाही आणि आमचाही नाही. तो आम्ही वेळोवेळी वेगवेगळ्या व्यासपीठावरून मांडलेला आहे. तुमच्या भावनेच्या विरोधात कोणीही नाही. परंतु चुकीच्या पद्धतीने....त्यात तुम्हीही बदनाम होता, हे तुम्हीही बघितलं आहे.

मागं-पुढं काहीतरी लिहायचं आणि चुकीच्या पद्धतीने दाखले काढायचे, त्या सर्वांना बदनामीला सामोरे जावे लागते. ही आमची पहिल्यापासूनची भूमिका आहे आणि आताही तीच आहे. आरक्षणाबाबत मराठा समाजाच्या ज्या भावना आहेत, त्या भावनांसोबत आम्ही आहोत. त्यामुळे कोणीही दुमत बाळगण्याचं कारण नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या वेळी गोपीचंद पडळकर यांनी जात पडताळणी समिती रद्द करण्याच्या मागणीवरही भाष्य केले. जात पडताळणी समिती फक्त मराठा समाजासाठीच नाही, तर ती समिती एससी, एसटी, एनटी, व्हीजेएनटी, ओबीसी या सर्वच जातींसाठी आहे, त्यामुळे मी तुमच्या सर्व गोष्टींना आरग्युमेंट करू शकत नाही. मी माझी भूमिका मांडली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT