ZP President : सोलापूर ZP अध्यक्ष प्रचंड संतापले, बैठकीतून उठून जाण्याचा प्रयत्न : ‘विश्वासात न घेता निर्णय घेणार असाल तर तुम्हीच कामकाज करा'

Solapur Zilla Parishad Standing Committee meeting : सोलापूर जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती बैठकीत अध्यक्ष दीपक वैद्य यांनी अधिकाऱ्यांना सुनावत आक्रमक भूमिका घेतली. विश्वासात न घेता निर्णय होत असल्याने त्यांनी सभेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.
Solapur Zilla Parishad-Deepak Vaidya
Solapur Zilla Parishad-Deepak VaidyaSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 05 Septemebr (विठ्ठल सुतार) : सोलापूर जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत पदाधिकारी, सदस्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच सुनावले. विशेष जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य यांचा रुद्रावतार पाहून इतर पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनाही घाम फुटला.‘आम्हाला विश्वासात न घेता निर्णय घेणार असाल तर तुम्हीच कामकाज करा,’ अशी आक्रमक भूमिका घेत अध्यक्ष वैद्य यांनी सभेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. मात्र, इतर पदाधिकाऱ्यांनी अध्यक्षांना थांबवत पुढील कामकाज केले. इतर सदस्यांनीही अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

अध्यक्ष दीपक वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची सभा पार पडली. सभेला उपाध्यक्ष इंद्रजित पवार, सभापती रामप्पा चिवडशेट्टी, सभापती चेतनसिंह केदार, सभापती संस्कृती सातपुते, सभापती अमृता वाघे, सीईओ कुशल जैन, संदीप कोहिनकर यांच्यासह समिती सदस्य व विभागप्रमुख उपस्थित होते.

सभेच्या सुरुवातीपासूनच विविध विषयांवरून सदस्यांसह पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावयला सुरुवात केली. आमचेच फोन उचलत नसाल तर सर्वसामन्यांचे काय, असा सवाल सदस्यांनी केला. मुख्यालयात सोमवारी आणि गुरुवारी उपस्थित राहणे बंधनकारक असताना अधिकारी दांडी मारतात. तसेच, फोनही उचलत नाहीत, अशी तक्रार सदस्यांनी केली.

अध्यक्ष दीपक वैद्य हे तर प्रचंड चिडले होते. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभापती यांना विश्वासात न घेता घेतलेल्या निर्णयावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ‘विश्वासात न घेता निर्णय घेणार असाल तर तुम्हीच कामकाज करा,’ असे म्हणत त्यांनी सभेतून उठून जाण्याचा प्रयत्न केला. या वेळी इतर पदाधिकारी व सदस्यांनी अध्यक्षांना थांबवत सभा सुरू ठेवली.

Solapur Zilla Parishad-Deepak Vaidya
Cloud Seeding : कृत्रिम पावसाचा कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय : महाराष्ट्र सरकारकडे बळीराजाचे डोळे

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी घेतलेले एकतर्फी निर्णय रद्द करून अध्यक्ष, उपाध्यक्षांसह सभापतींना विश्वासात घेऊनच निर्णय घ्यावेत, असा निर्णय या वेळी घेण्यात आला. जिल्ह्यातील ग्रामपंचायतींवर नेमलेल्या प्रशासकांची मुदत संपली आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींचे कामकाज सुरळीत चालण्यासाठी तातडीने निर्णय घ्यावा. त्यासाठी सरकारकडे मार्गदर्शन मागावे, अशी मागणी सदस्यांनी केली.

हिरव्याऐवजी पांढऱ्या वाटण्याचे वाटप

जिल्हा परिषद सदस्य दादासाहेब लवटे यांनी पोषण आहारातील तांदूळ व वाटाणा वाटपाची चौकशी करण्याची मागणी केली. हिरव्या वाटाण्याऐवजी पांढऱ्या वाटाण्याचे वाटप करण्यात आले असून, याची चौकशी करून गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी त्यांनी केली. जिल्हा परिषद शाळांच्या दुरुस्तीसाठी १ कोटी ८३ लाख रुपयांची तरतूद असताना हा निधी खर्च का झाला नाही, याची माहिती सभागृहात द्यावी, अशी मागणीही लवटे यांनी केली.

Solapur Zilla Parishad-Deepak Vaidya
Maharashtra Politics : शेकापचे आमदार बाबासाहेब देशमुखांचं 'भाजप' कार्यालयात आदरातिथ्य, सोबतच्या काँग्रेस आमदाराचाही सन्मान

सभेतील मुद्दे

- अध्यक्षांच्या परवानगीशिवाय निर्णय नको

- अध्यक्ष वा संबंधित विभागाच्या सभापतींची कोणतीही परवानगी न घेता परस्पर निर्णय घेऊ नये.

- शिक्षण विभागाची बैठक बोलावली; अध्यक्ष, उपाध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांना निरोप का नाही?

- मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे फायली प्रलंबित राहतात; त्यावर दोन ते तीन दिवसांत निर्णय घ्यावा.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com