Hasan Mushrif and Chhagan Bhujbal  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Maratha Reservation : मंत्री मुश्रीफांनी भुजबळांचे कान टोचले; कुणबी दाखले योग्य, की अयोग्य ठरविण्याचा अधिकार समितीला

Hasan Mushrif and Chhagan Bhujbal : राज्य सरकारने स्थापन केलेली शिंदे समिती रद्द करण्याची मागणी भुजबळांनी केली आहे.

Rahul Gadkar

Kolhapur News : राज्यभरात मराठा आरक्षण व कुणबी दाखल्यावरून राजकारण तापले असताना कोल्हापूरचे पालकमंत्री व वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी मंत्री छगन भुजबळ यांचे कान टोचले आहेत. मंत्री भुजबळ यांनी पहिल्यापासूनच मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला आहे. तुमची मतं वेगळी असतील तर त्यांनी उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री यांच्या निदर्शनास आणून द्यावीत, असे ते म्हणाले आहेत.

"मंत्री भुजबळ यांचा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे. अलीकडच्या काळात कुणबी दाखले दिले जात आहेत. त्यामुळे कुणबी दाखले देण्याबाबत भुजबळांची मते वेगळी आहेत. कुणबी दाखले योग्य आणि कायदेशीर असतील तर त्यांना ओबीसी दाखले द्यावेच लागतील. कुणबी दाखले योग्य, की अयोग्य हे ठरवण्याचा अधिकार कुणाला आहे ?", अशा शब्दांत मंत्री मुश्रीफ यांनी छगन भुजबळ यांना सुनावत कुणबी दाखले योग्य की अयोग्य ठरवण्याचा अधिकार सर्वस्वी अधिकार समितीलाच असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"मोठ्या प्रमाणात कुणबी दाखले मिळत असल्यानं भुजबळ यांना प्रश्न पडला असेल, तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना सांगितलं पाहिजे. कारण हा मंत्रिमंडळाचा सामूहिक निर्णय बदलायचा असेल तर कॅबिनेटमध्ये चर्चा झाली पाहिजे. त्यापूर्वी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा केली पाहिजे", असे मत मुश्रीफ यांनी व्यक्त केले.

दरम्यान, मंत्री भुजबळ यांनी रविवारी हिंगोलीतील सभेत बोलताना मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या प्रश्नावर राज्य सरकारने स्थापन केलेली शिंदे समिती रद्द करण्याची मागणी केली. त्यांच्या या मागणीमुळे राजकारण तापण्याची शक्यता आहे, तर आता कुणबी दाखले योग्य की अयोग्य ठरविण्याचा अधिकार समितीला असल्याचे सांगत मंत्री मुश्रीफांनीही भुजबळांचे कान टोचले आहेत.

(Edited By - Ganesh Thombare)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT