Maratha Reservation News Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून ग्रामपंचायत सदस्याचा राजीनामा

Kolhapur News : कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता सर्व बाजूंनी कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण द्या..

Mangesh Mahale

Kolhapur : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी ग्रामपंचायत सदस्यपदाचा राजीनामा देण्याचे सत्र सुरू झाले आहे. पुणे, सातारा जिल्ह्यात ग्रामपंचायत सदस्यांनी राजीनामा दिल्यानंतर आता कोल्हापुरातही विद्यमान सदस्य, माजी उपसरपंचांनी राजीनामा दिला आहे.

पाडळी खुर्द (ता. करवीर) येथील ग्रामपंचायत माजी उपसरपंच, विद्यमान सदस्य नीलम अमित कांबळे यांनी आपल्या सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. राजीनाम्याचे पत्र जिल्हाधिकारी यांना दिले. लवकरात लवकर सरकारने आरक्षण द्यावे, अन्यथा जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्यांची संपर्क साधून आंदोलन तीव्र करू, असा इशारा कांबळे यांनी दिला.

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरू आहे. मराठा समाज हा दलित समाजाचा मोठा भाऊ आहे. आपण सदस्य म्हणून अडीच वर्षे काम केले, तसेच उपसरपंच म्हणून काम केले आहे. मराठा समाजाच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या आंदोलनाला मी स्वतः व माझ्या समाजाच्या वतीने पाठिंबा देत आहे. कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता सर्व बाजूंनी कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात राजीनामा दिला आहे. हे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे. सकल मराठा समाजाच्या बैठकीत पाठिंबा जाहीर करत राजीनामाचे पत्र देणार आहे, असे त्या म्हणाल्या. मराठा समाज व दलित समाजाच्या आर्थिक सामाजिक शैक्षणिक अडचणी वाढल्या आहेत. त्या सोडवण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत, अन्यथा भविष्यात उद्रेक होईल असे चित्र आहे. शैक्षणिक संस्था बहुतांश मराठा समाजाच्या आहेत. यामध्ये संस्थाचालकांनी प्रयत्न करावेत, असे कांबळे म्हणाल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT