Devendra Fadnavis : सत्तेत असतानाही दुजाभाव; पदाधिकाऱ्याचा रोख शिंदे गटाकडे, थेट फडणवीसांकडे तक्रार

BJP News : शिंदे गट व भाजपमधील वाद अनेकदा चव्हाट्यावर आले आहेत.
Eknath Shinde, Devendra Fadnavis
Eknath Shinde, Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Mumbai : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कल्याणचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या घरी वैयक्तिक भेटीसाठी आले होते. या वेळी पदाधिकाऱ्यांनी त्यांच्यासमोर पोलिस आणि शिंदे गटाबाबतची खंत व्यक्त केली. "साहेब, आपण सत्तेत असतानाही पोलिस आमच्यासोबत दुजाभाव करतात, प्रशासन आम्हाला डावलतंय," अशी व्यथा भाजप जिल्हा अध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी यांनी फडणवीसांकडे मांडली.

वाद अनेकदा चव्हाट्यावर

विकासकामांबाबत देखील प्रशासन भाजपच्या माजी नगरसेवक लोकप्रतिनिधींना डावलत असल्याचेदेखील पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या निदर्शनास आणून दिले. या भेटीदरम्यान भाजप पदाधिकाऱ्यांचा रोख सत्ताधारी शिवसेना शिंदे गटाकडे होता. कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गट व भाजपमधील वाद अनेकदा चव्हाट्यावर आले आहेत.

Eknath Shinde, Devendra Fadnavis
Maratha Reservation: मराठा आंदोलनाचे राजकीय पडसाद; ग्रामपंचायत सदस्यांचे राजीनामा सत्र सुरूच

अंतर्गत धुसफूस कायमच

याबाबत भाजप व शिंदे गटाच्या वरिष्ठ नेत्यांनी मध्यस्थी करीत हा वाद मिटला असल्याचे स्पष्टीकरण दिले होते. मात्र, आज पुन्हा एकदा भाजप पदाधिकाऱ्यांनी सत्तेत असूनदेखील भाजपसोबत दुजाभाव सुरू आहेत. डावलले जात असल्याची व्यथा फडणवीसांसमोर मांडली. त्यामुळे शिवसेना शिंदे गट व भाजपमधील अंतर्गत धुसफूस कायमच असल्याचे चित्र आहे.

कोणतीही कारवाई झाली नाही...

"आमच्या कार्यकर्त्याला शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून मारहाण झाली. मात्र, त्याच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. पोलिसांकडून दुजाभाव सुरू आहे. आमचे लोकप्रतिनिधी, माजी नगरसेवकांना विकासकामांसंदर्भात प्रशासनाकडून डावलले जात आहे," अशी व्यथा भाजप जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी यांनी मांडली .

वरिष्ठ नेत्यांकडून वादावर पडदा...

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कल्याणचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या घरी वैयक्तिक भेटीसाठी आले होते. यादरम्यान भाजप नेत्यांनी आपली खदखद बोलून दाखवली आहे .भाजप पदाधिकाऱ्यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना कुणाचं नाव घेतलं नसलं तरी त्यांचा रोख अप्रत्यक्षरित्या शिवसेना शिंदे गटाकडे होता . त्यामुळे भाजप व शिवसेना शिंदे गटाच्या वरिष्ठ नेत्यांकडून वादावर पडदा पडल्याचे बोलले जात असले तरी कल्याणमध्ये भाजप आणि शिंदे गटात धुसफूस सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे .

Eknath Shinde, Devendra Fadnavis
Babanrao Dhakane : विधिमंडळाच्या सभागृहात उडी मारणारे बबनराव ढाकणे; पाथर्डीकरांसाठी ऑर्थर रोड तुरुंगात...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com