Manoj Jarange Maratha Reservation  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Maratha Reservation : हुडहुडी भरविणाऱ्या थंडीत पहाटे तीन वाजता जरांगेंच्या सभेसाठी तरुणांचा उत्साह कायम...

Manoj Jarange Patil: माझ्या जिवात जीव असेपर्यंत मी समाजासाठी लढत राहणार...

Mangesh Mahale

Pandharpur News : मराठा आरक्षणाच्या जनजागृतीसाठी पश्चिम महाराष्ट्रात मनोज जरांगे पाटील यांचा दौरा सुरू आहे. कालपासून (बुधवार) त्यांच्या दौऱ्याला सुरुवात झाली आहे. उजनी धरणाच्या शेजारी जरांगेंची सभा झाली. हुडहुडी भरविणाऱ्या थंडीत पहाटे तीन वाजता जरांगेंच्या सभेसाठी हजारों मराठा तरुणांचा उत्साह कायम होता.

करमाळा तालुक्यातील वांगी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या सभेचे आयोजन केले होते. सभेसाठी हजारो मराठा बांधव उपस्थित होते. रात्री आठ वाजता होणारी सभा पहाटे तीन वाजता सुरू झाली. तब्बल पाच ते सहा तास उशिराने सभा सुरू झाल्यानंतरही उपस्थितांनी जरांगेंचे जल्लोषात स्वागत केले.

उजनी धरणाच्या जवळ सभा असल्याने या भागात थंडीचे प्रमाण अधिक होते. तरीही परिसरातील मराठा बांधव सभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते."प्रत्येक गावोगावी लोकांनी माझं स्वागत केलं, त्यामुळे येथे यायला उशीर झाला.

मराठा समाज बांधव गाडीला आडवे पडून मला थांबवून माझे स्वागत करीत होते. त्यामुळे मला यायला उशीर झाला. इतक्या वेळानंतरही तुम्ही माझ्यासाठी बसून आहात. नक्कीच तुमच्या या सभेची महाराष्ट्र नोंद घेईल," असं सांगत जरांगे पाटलांनी सभेला उशीर झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"माझ्या जिवात जीव असेपर्यंत मी समाजासाठी लढत राहणार आहे. मराठा समाजाला आरक्षण घेतल्याशिवाय मी एक इंच पण मागे हटणार नाही. एक डिसेंबरपासून गावागावात साखळी उपोषण सुरू करा," असे आवाहन जरांगे यांनी केले. "सरकारने 24 डिसेंबरच्या आत सरकट कुणबी म्हणून मराठा समाजाला आरक्षण जाहीर करावे, अन्यथा संघर्ष अटळ आहे," असा इशारा त्यांनी करमाळ्याच्या सभेत दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT