Jalna: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांच्या गावात सशस्त्र दरोडा पडल्याची माहिती समोर येत आहे. बीडच्या शिरूर कासार तालुक्यातील मातोरी गावात या दरोड्याची घटना घडली आहे. यामध्ये हजारोंचा ऐवज लंपास करण्यात आला असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरोडेखोरांच्या मारहाणीत पती-पत्नी गंभीर जखमी झाले आहेत. अर्चना आणि रमेश गायकवाड अशी जखमी असलेल्या पीडितांची नावे आहेत. मध्यरात्री पडलेल्या दरोड्याने गावात दहशत निर्माण झाली आहे. गंभीर पती पत्नीवर बीडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मनोज जरांगेंना आज रूग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. ते अंतरवाली सराटीला आले आहे. यंदा दिवाळी साजरी करणार नसल्याचे त्यांनी माध्यमांना सांगितले. दोन दिवसांच्या आरामानंतर लागलीच राज्याचा (maharashtra Tour) दौरा सुरु करणार असल्याचे जरांगे यांनी सांगितले.
जरांगे म्हणाले, "आत्महत्या केलेल्या बांधवांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहे. 15 नोंव्हेबरपासून दौरा करणार आहे. यात मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मुंबई असा दौरा असेल. 24 डिसेंबरपर्यत सर्व मराठा बांधवांना आरक्षण मिळणार आहे. सरकारवर दबावासाठी दौरा नाही, तर लोकांच्या भेटीगाठीसाठी दौरा आहे,"
भोकरदन मध्ये दोन गटात मारामारी झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. "भोकरदनमध्ये दादागिरी सुरू असेल तर मराठे मोडून काढतील, ज्यांनी आमच्या पोरांना मारले त्यांच्यावर कारवाई करा, भोकरदन सहित सगळ्या नेत्यांना सांगतो," असा अप्रत्यक्ष इशारा भाजप नेते रावसाहेब दानवे यांना जरांगेना दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.