Shambhuraj Desai sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Shinde Committee : कुणबी दाखल्यासंदर्भात मंत्री शंभूराज देसाई न्यायमूर्ती शिंदे समितीला भेटणार

Sudesh Mitkar

हेमंत पवार

Karad News: कुणबी दाखले काढताना प्रशासकीय पातळीवर होणाऱ्या अडचणींचा विचार करून त्यात समन्वयाने तातडीने तोडगा काढावा, अशी मागणी कराड तालुका मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात येणार होती. मात्र, मुख्यमंत्री शिंदे यांचा कराड दौरा अचानक रद्द झाल्याने सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांना या मागणीचे निवेदन देण्यात आले. देसाई यांनी या प्रश्नसंदर्भात मराठा आरक्षणासंदर्भात गठीत करण्यात आलेल्या माजी न्यायमूर्ती शिंदे यांना भेटून या संदर्भातील माहिती अवगत करेन, अशी ग्वाही मराठा समाजाला या वेळी दिली.

सर्व महसुली, फौजदारी, शालेय, शासकीय दाखले कागदपत्रे तपासून पूर्ण होण्याची शक्यता फार कमी आहे. त्यासाठी मनुष्यबळ वाढवणे गरजेचे आहे. कुणबी दाखले काढण्यासाठी तहसीलमधील सेतू कार्यालयाच्या ठिकाणी अर्ज स्वीकारले गेले पाहिजेत. कारण बहुतांश ठिकाणी महा-ई-सेवा केंद्रात अर्ज करा असे उत्तर दिले जात आहे. तसेच मोडी लिपी वाचक तज्ज्ञांची संख्या फार कमी आहे. 1920 पूर्वीचे पुरावे वाचने अत्यंत गरजेचे आहे. ते सर्व मोडी लिपीत आहेत. सध्या ते वाचन होताना दिसत नाहीत. त्यासाठी शासन प्रमाणित 10 वाचक प्रत्येक तहसील कार्यालयात उपलब्ध करावेत, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

प्रशासकीय कार्यालयात जुनी कागदपत्रे तसेच जुने दस्तावेज याबद्दल प्रचंड अनास्था दिसून येत आहेत. अनेक जुनी कागदपत्रे गहाळ झाल्याचेही दिसून येत आहे. याबाबत प्रशासकीय स्तरावरून योग्य ते मार्गदर्शन व सूचना होणे आवश्यक आहे . कुणबी दाखल्यासाठी लागणारे दस्तऐवज शोधकामध्ये बिगर मराठा शासकीय कर्मचाऱ्यांचे प्रचंड गोंधळ कारभार निदर्शनास येत आहे. यासाठी त्यांचे योग्य होते मार्गदर्शन होणे आवश्यक आहे.

पोलीस, प्रशासन, शाळा, नगरपालिका, जिल्हा परिषद या ठिकाणी होणारी तपासणी सकल मराठा समाजाच्या प्रतिनिधींचे सहाय्य घेण्यात येऊन करावे. ओबीसी प्रवर्गातील कुणबी सोडून इतर कोणत्याही जातीचा दाखला काढत असताना सर्कल चौकशी आणि 25 लोकांचा जबाब घ्यावा लागत नाही परंतु कुणबी दाखल्यासाठीची अट का ठेवली आहे असा सवाल उपस्थित करत ती अट रद्द करावी अशी मागणी कराड तालुका मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने करण्यात आली आहे.

तसेच तलाठी सरपंच पोलीस पाटील यांना स्थानिक पातळीवर वंशावळ महसुली पुरावे पडताळून स्थानिक चौकशीवरून दाखला द्यावा. आणि सापडणारे कुणबी दस्तऐवजी प्रत्येक गावामध्ये खुले केले जावे जेणेकरून सर्वसामान्यांना याची माहिती मिळून जातीचा दाखला काढण्याची प्रक्रिया सुरू होईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT