Prithviraj Chavan: माजी मुख्यमंत्र्यांनी टोचले सत्ताधाऱ्यांचे कान; प्रीतिसंगमावर या,आत्मपरीक्षण करा..

Yashwantrao Chavan Death Anniversary: अजित पवार, सुप्रिया सुळे, शंभुराज देसाईंनी यशवंतरावांना अभिवादन केले.
Yashwantrao Chavan Death Anniversary
Yashwantrao Chavan Death AnniversarySarkarnama
Published on
Updated on

Karad: महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा आज (शनिवारी) स्मृतीदिन आहे. यानिमित्ताने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक राजकीय नेते, मंत्री हे कराड येथील समाधी स्थळावर (प्रीतिसंगम) जाऊन त्यांच्या स्मृतीस वंदन केले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रीतिसंगमावर येणाऱ्या सत्ताधाऱ्यांचे कान टोचले.

"यशवंतराव चव्हाणांच्या समाधी स्थळावर सत्ताधाऱ्यांनी एक दिवस नाही तर दररोज सकाळ-संध्याकाळ येवून आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे," अशा शब्दात पृथ्वीराज चव्हाणांनी शिंदे-फडणवीस-पवार यांना टोला लगावला. अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, मंत्री शंभुराज देसाई आदींनी आज यशवंतरावांच्या समाधीस्थळी जाऊन त्यांना अभिवादन केले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Yashwantrao Chavan Death Anniversary
Sharad Pawar - Ajit Pawar भेटीवर फडणवीसांचं स्पष्टीकरण | NCP | BJP | Devendra Fadnavis | Sarkarnama

फडणवीसांनी फसवणूक केली...

"आम्ही आरक्षण दिले होते, पण आमचे आरक्षण टिकले नाही.आमची आघाडी फोडली, आमचे सरकार गेले. फडणवीसांनी दिलेलं आरक्षण ही साफ फसवणूक होती. राज्याचे अधिकार केंद्राने काढून घेतल्यानंतर फडणवीसांनी आरक्षण दिले होते," असा आरोप चव्हाणांनी केला.

सध्या मराठा आरक्षणाचा मुद्या चर्चेत आहे, यावर चव्हाण यांनी भाष्य करीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र डागले. "महाराष्ट्र हे प्रगतीशील आणि पुरोगामी राज्य म्हणून देशात ओळखले जाते, ते यशवंतराव चव्हाण यांच्या आदर्श राज्यपद्धतीमुळे. सुसंस्कृत महाराष्ट्रात विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात कुठेही तेढ निर्माण होऊ नये, एकमेकांचा आदर करावा आणि त्यातून समाजकारण व राजकारण कसे करायचे असते याचा आदर्श यशवंतरावांनी आमच्यासमोर घालून दिलेला आहे," अजित पवार म्हणाले.

Yashwantrao Chavan Death Anniversary
NCP News: अजितदादांच्या नेत्याचा नादच खुळा; नृत्यांगनेवर पैसे उधळणं आलं अंगलट...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com