Bhosare andolan sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Khatav : मांजरेकरांच्या निषेधार्थ भोसरेत मोर्चा; इतिहासाच्या मोडतोडीवर ग्रामस्थ संतप्त

भोसरे गावाला Bhosare प्रतापराव गुजर Prataprao Gujar यांच्यामुळेच पर्यटन स्थळाचा Turisum place विशेष ब दर्जा प्राप्त झाला आहे. गावात ऐतिहासिक दस्तावेज Historical documents आजदेखील उपलब्ध आहेत.

राजेंद्र शिंदे

खटाव : दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या जीवन चरित्रावर काढलेल्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटात चुकीच्या पद्धतीने इतिहास मांडल्याने सातारा जिल्ह्यातील भोसरे (ता.खटाव) या सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या जन्मगावी चित्रपटाबाबत ग्रामसभेत तीव्र आक्षेप घेण्यात आला. इतिहासाची मोडतोड करून चित्रपट तयार करण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर रविवारी (ता. 13) ग्रामस्थांनी गावातून फेरी काढत महेश मांजरेकर यांच्या निषेधार्थ घोषणा देत संताप व्यक्त केला.

ग्रामस्थांनी ग्रामसभेत चित्रपटातील विविध आक्षेपार्ह मुद्दे उस्थित केले.यामध्ये भोसरे हे सरसेनापती प्रतापराव गुजर यांचे जन्मगाव असून महेश मांजरेकरांना या गावाचा विसर पडला. त्यांनी चित्रपटात सरसेनापती प्रतापराव गुजर यांचे जन्मगाव कोकणातले दाखवले आहे. भोसरे गावाला प्रतापराव गुजर यांच्यामुळेच पर्यटन स्थळाचा विशेष ब दर्जा प्राप्त झाला आहे. गावात ऐतिहासिक दस्तावेज आजदेखील उपलब्ध आहेत.

असं असताना चित्रपट तयार करण्यापूर्वी या गावाला साधी भेट देण्याची गरज देखील त्यांना भासली नाही. महेश मांजरेकर याबाबतीत कसलाही अभ्यास न करता प्रेक्षकांची दिशाभूल आहेत हे मनाला अस्वस्थ करणारे असल्याचे मत व्यक्त करण्यात आले . याशिवाय प्रतापराव गुजर यांची व्यक्तिरेखा साकारत असलेले प्रवीण तरडे हे सरसेनापती कुठच वाटत नसून सराईत गुंड असल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले.

सरसेनापती प्रतापराव गुजर हे भोसरे गावची अस्मिता असून त्यांच्या नावाखाली काहीही विकृत दाखवण्याचा प्रयत्न ग्रामस्थ सहन करणार नाहीत असा इशारा यावेळी देण्यात आला. याबाबतीत महेस मांजरेकरांनी आपला आडमुठेपणा सोडून भोसारे ग्रामस्थांच्या भावना लक्षात घेऊन समोरासमोर बसून चर्चा करावी अन्यथा येणाऱ्या काळात शिवप्रेमींच्या रोषाला सामोरे जात होणाऱ्या नुकसानीला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी असा इशारा यावेळी देण्यात आला.

ग्रामसभेत सरसेनापती प्रतापराव गुजर स्मृतीअधिष्ठानचे अध्यक्ष कैलास गुजर ,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा आघडी जिल्हा अध्यक्ष तानाजी देशमुख,संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र प्रदेश संघटक प्रदीप कणसे, जिल्हा समन्वयक पांडुरंग पवार, जिल्हाध्क्ष अनिल जाधव यांनी मनोगत व्यक्त केले.तत्पूर्वी सायंकाळी सरसेनापती यांच्या प्रवेशद्वारापासून निषेध मोर्चा काढून सरसेनापती यांच्या मूळनिवासस्थानी येत त्यांच्या पुतळ्याला हार घालून मोर्चाचा शेवट करण्यात आला.

या मोर्चामध्ये गावातील शेकडो पुरुष, महिला, युवक, युवतींनी निषेध करण्यासाठी सहभाग घेतला होता. यावेळी संभाजी ब्रिगेडचे सर्व पदाधिकारी गावकऱ्यांना पाठबळ देण्याकरिता उपस्थित होते. कार्यक्रमाला उपसरपंच सतीश जाधव,नितीन पाटील, पोलीस पाटील सागर जाधव, पैलवान अधिक जाधव, संतोष जाधव, हणमंत गुजर, ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक लहुराज दरेकर यांनी केले व आभार प्राध्यापक संतोष मोरे यांनी मानले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT