दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा

मुंबई पोलीसांनी 'पोक्सो' अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.
Mahesh Manjrekar Latest News, High court gives relief to Mahesh Manjarekar
Mahesh Manjrekar Latest News, High court gives relief to Mahesh Manjarekarsarkarnama
Published on
Updated on

मुंबई : दिग्दर्शक महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांना मुंबई उच्च (Mumbai High Court) न्यायालयाने मोठा दिला दिला आहे. पुढील सुनावनी होईपर्यंत पोलिसांना (Police) कोणतिही कारवाई न करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तपासांत पोलीसांना पूर्ण सहकार्य करण्यास तयार, असल्याची ग्वाही मांजरेकर यांनी न्यायालयात दिली. त्यामुळे न्यायालयाने त्यांना मोठा दिलासा दिला.‘नाय वरण-भात लोणचा, कोण नाय कोणच्या’या चित्रपटामध्ये लहान मुलांचे वादग्रस्त चित्रिकरण, अश्लील प्रसंग, अल्पवयीन मुलांचे नकारात्मक चित्रीकरण केल्याच्या आरोपाखाली त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मांजरेकर यांच्यावर मुंबई सत्र न्यायालयाच्या निर्देशांनंतर मुंबई पोलीसांनी 'पोक्सो' अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. महेश मांजरेकर यांच्या विरोधात सीमा देशपांडे यांनी पॉस्को न्यायालयात तक्रार दाखल केली होती. या आधी त्यांनी पोलिसात तक्रार दिली होती. मात्र, त्यांची दखल पोलिसांनी घेतली नव्हती. त्यानंतर त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. (High court gives relief to Mahesh Manjarekar)

Mahesh Manjrekar Latest News, High court gives relief to Mahesh Manjarekar
धक्कादायक : रशिया-युक्रेन युद्धात भारतीय विद्यार्थ्याचा हकनाक बळी

'नाय वरण भात लोंच्या, कोण नाय कोणचा' या चित्रपटामध्ये लहान मुलांचा चुकीच्या पद्धतीने वापर केल्यामुळे त्यांच्याविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत याचिका दाखल केली होती. त्याप्रकरणी न्यायालयाने पोलिसांना चोकशीचे आदेश दिले होते. हा चित्रपट मुंबईतील गिरणी कामगारांच्या जीवनावर आधारित असल्याचे सांगण्यात येते. या चित्रपटामध्ये लहान मुलांचचे अनेक भडक दृश्य चित्रीत करण्यात आले आहेत, असा आरोप करण्यात आला आहे.

या संदर्भात आपण न्यायालयात जाणार असून माझे वकील त्याला उत्तर देतील, सेन्सॉर बोर्डने त्याला मंजूरी दिली असल्याची प्रतिक्रिया मांजरेकर यांनी एका इंग्रजी दैनिकाला दिली होती. या चित्रपटाचे ट्रेलर प्रदर्शित झाल्यावर राष्ट्रीय महिला आयोगाच्या प्रमुख रेखा शर्मा यांनी माहिती-प्रसारण मंत्रालयाला याबाबत पत्र लिहिले होते. या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी त्यांनी केली होती. महेश मांजरेकर यांचा या सिनेमाचा ट्रेलर १० जानेवारी रोजी युट्यूबवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातील काही वादग्रस्त दृश्यांमुळे हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी वादात सापडला आहे. याबाबत महिला आयोगाने पत्र लिहून चित्रपटावर नाराजी व्यक्त केली आहे.

Mahesh Manjrekar Latest News, High court gives relief to Mahesh Manjarekar
"...तर भाजपचे शिवसेनेला १०० टक्के समर्थन" : शेलारांचे मुख्यमंत्र्यांना आश्वासन

'नाय वरण भात लोंच्या, कोण नाय कोणचा' मधीलआक्षेपार्ह सीन चित्रपटातून काढून टाकावेत,'' अशी मागणी राष्ट्रीय महिला आयोगाने माहिती व प्रसारण मंत्रालयाकडे केली होती, तर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी याबाबत मांजरेकरांना नोटीस पाठविली होती. याबाबत खुलासा करण्यास सांगितले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com