Sambhaji Bhide supporters Morcha Pramod Ingale, Satara
पश्चिम महाराष्ट्र

Satara Morcha News: संभाजी भिडेंच्या समर्थनार्थ साताऱ्यात मोर्चा; प्रतिमेला दुग्धाभिषेक...

Sambhaji Bhide संभाजी भिडे यांनी थोर पुरुषांविषयी केलेल्या वक्तव्यावरुन त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.

Umesh Bambare-Patil

Satara News : संभाजी भिडे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून सर्वत्र टीका होत असताना साताऱ्यात भिडे यांच्या समर्थनार्थ हिंदुत्ववादी संघटना आणि धारकऱ्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर माेर्चा काढला. तसेच पोवई नाक्यावर संभाजी भिडे यांच्या प्रतिमेला दुग्धभिषेक करण्यात आला. मोर्चात मोठ्यासंख्येने धारकरी व महाविद्यालयीन युवक सहभागी झाले होते.

संभाजी भिडे Sambhaji Bhide यांनी थोर पुरुषांविषयीच्या वादग्रस्त वक्तव्यावरुन त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. काँग्रेसने तर त्यांना अटक करावी, या मागणीसाठी राज्यभर आंदोलन सुरु केले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आज साताऱ्यात Satara संभाजी भिडे यांच्या समर्थनार्थ हिंदुत्ववादी संघटना आणि धारकऱ्यांनी मोर्चा काढला.

यावेळी पोवई नाक्यावर संभाजी भिडे यांच्या प्रतिमेला दुग्धभिषेक घालण्यात आला. त्यानंतर मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर गेला. येथे शिवप्रतिष्ठानच्या धारकऱ्यांचे मार्गदर्शन झाले. यावेळी माध्यमांनी भिडे यांचा एकेरी उल्लेख टाळावा अशी आगपाखड देखील भिडे समर्थकांनी केली.

आमदार विद्या ठाकूर यांची संभाजी भिडे यांच्या चपलीपाशी उभे राहण्याची लायकी नाही. भिडेंबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या ठाकूर यांच्यावर कारवाई करून गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. भिडेंच्या समर्थनार्थ निघालेल्या मोर्चाला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग पाहायला मिळाला.

यासंदर्भात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानने दिलेल्या निवेदनात म्हटले की, भिडे गुरूजी यांनी विदर्भात सभांचा धडाका लावला आहे. या सर्व सभा यशस्वी होत असताना काही नतद्रष्टांच्या नजरेत हे खुपत आहे. या सभांतून श्री. भिडे गुरूजी अभ्यासपूर्ण मार्गदशन करून युवकांना हिंदूधर्माप्रति जागृत करत आहेत.

ददेशाचा, महाराष्ट्राचा तसेच श्री शिवछत्रपती व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा दैदिप्यमान असा इतिहास सांगत आहेत. त्यांच्या काही वक्तव्यांना विरोध म्हणून काही फुटकळ संघटनांच्या कार्यकर्त्यांनी गुरूजींवर अत्यंत हिन पद्धतीने खालच्या दर्जाची चिखल फेक सुरू केली आहे. या सर्व गैरकृत्याचा शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान निषेध करत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT