Atul Bhosle  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Loksabha Election 2024 : लोकसभेला मातंग समाजाला डावलले; नेतेमंडळी उचलणार मोठे पाऊल

Political News : भाजपचे नेते अतुल भोसले यांच्या निवासस्थानासमोर निदर्शने करण्याची घोषणा दलित महासंघाने केली होती. मात्र, पोलीसांनी आचारसंहितेचे कारण सांगून दलित महासंघाच्या कार्यकर्त्यांना निदर्शने करण्यास विरोध केला. पोलीसांनी महासंघाच्या शिष्ट मंडळास भेटण्याची परवानगी दिली.

सरकारनामा ब्यूरो

सचिन शिंदे

Satara Loksabha News : मातंग समाजाला लोकसभेची एकही उमेदवारी दिली नसल्यामुळे भारतीय जनता पक्षावर नाराज असलेल्या दलित महासंघाचे नेते प्रा. डॉ. मच्छिंद्र सकटे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची लवकरच बैठक आयोजित करणार आहोत, असे आश्वासन भाजपचे सातारा लोकसभा प्रभारी अतुल भोसले यांनी दलित महासंघाच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेवेळी दिले.

भाजपचे नेते अतुल भोसले (Atul Bhosle) यांच्या निवासस्थानासमोर निदर्शने करण्याची घोषणा दलित महासंघाने केली होती. मात्र, पोलीसांनी आचारसंहितेचे कारण सांगून दलित महासंघाच्या कार्यकर्त्यांना निदर्शने करण्यास विरोध केला. पोलीसांनी महासंघाच्या शिष्ट मंडळास भेटण्याची परवानगी दिली.

भोसले व प्रा. सकटे यांचीही बैठक घडवून आणली. यावेळी शिष्टमंडळामध्ये माजी आमदार आनंदराव पाटील (Anandrao Patil), दलित महासंघाचे राज्य कार्याध्यक्ष प्रकाश वायदंडे, आनंदराव मोहिते, बहुजन समता पार्टीचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ दाभाडे, तालुकाध्यक्ष जयवंत सकटे, बाबासाहेब दबडे, बळीराम रणदिवे, अरुणा कांबळे, भरत साठे उपस्थित होते.

प्रा. सकटे म्हणाले, महाराष्ट्रातील मातंग समाजाची सामाजिक व राजकीय स्थिती बिकट आहे. त्यांचे प्रश्न सोडवणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समाजाच्या संदर्भात केलेल्या कामही महत्वाचे आहे. मात्र लोकसभेच्या एकूण ४८ पैकी पाच जागा अनुसूचित जातीसाठी राखीव असताना, त्यातील एकही जागा मातंग समाजाला दिली गेली नाही, हबी आमची खंत व्यक्त केली.

या सर्व प्रश्नावर भाजपचे नेते अतुल भोसले यांनी दलित महासंघाच्या शिष्टमंडळास आश्वासन दिले की, "राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मच्छिंद्र सकटे यांची लवकरच भेट घालून देणार आणि मातंग समाजाच्या भावनांची जपणूक करणार" अशा प्रकारच्या आश्वासन अतुल भोसले यांनी दलित महासंघाच्या शिष्टमंडळास दिले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

बैठकीमध्ये भोसले यांनी दलित प्रा. सकटे यांचा सत्कार केला. राजकीय हक्कापासून वंचित असलेल्या मातंग समाजाला त्यांचा योग्य तो वाटा देऊन, त्यांना सन्मानाने सोबत घ्यावे, अशी मागणी प्रा. सकटे यांनी केली. पोलीसांनी दलित महासंघाच्या आंदोलनाची गंभीर दखल घेतली होती. दलित महासंघाच्या कार्यकर्त्याला नोटीस दिल्या होत्या. त्याचबरोबर कृष्णा रूग्णालय येथे मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

चव्हाणांच्या घरी रविवारी

भाजपचे अतुल भोसले यांची भेट घेतल्यानंतर प्रा. सकटे उद्या (शनिवारी) माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या निवासस्थानी भेट घेणार होते. मात्र चव्हाण परगावी आहेत. त्यामुळे रविवारी त्यांची घरी भेट घेणार आहोत, असे प्रा. सकटे यांनी स्पष्ट केले. पोलिसांच्या विनंतीसह आचारसंहितेमुळे आंदोलन रद्द करून भेट घेवून दलित समाजाच्या भावना शिष्टमंडळासमोर मांडण्याचे काम करत आहोत, असेही प्रा. सकटे यांनी स्पष्ट केले.

(Edited by: Sachin waghmare )

SCROLL FOR NEXT