Baramati Politics : हर्षवर्धन पाटलांचा अजितदादांवर भरोसा नाय का? थेट फडणवीसांनाच घातलं साकडं, म्हणाले...

Harshvardhan Patil Vs Ajit Pawar : गतवेळी आपला निसटता पराभव झाला आहे. मात्र, आम्ही खचलो नाही. येणारा काळ आपला आहे. त्यामुळे इंदापूरमध्ये विधानसभेत भाजपचा झेंडा फडकावल्याशिवाय राहणार नाही.
Ajit Pawar, Devendra Fadnavis, Harshvardhan Patil
Ajit Pawar, Devendra Fadnavis, Harshvardhan PatilSarkarnama

Baramati Political News : लोकसभेचे काम करूनही पवार कुटुंबीयांनी विधानसभेत दगाफटका केल्याचा आरोप यापूर्वी भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्यासह त्यांच्या कन्या अंकित पाटील-ठाकरेंनी जाहीरपणे सांगितले आहे. आता राष्ट्रवादीत फूट पडल्याने अजित पवार Ajit Pawar हे महायुतीचा घटक झाले आहेत. त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार लोकसभा निवडणूक लढवत आहेत. मात्र, पूर्वीच्या अनुभवावरून पाटलांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांनाच इंदापूर भाजपचे पालकत्व स्वीकारण्याचे साकडे घातले आहे. परिणामी पाटलांचा अद्यापही अजित पवारांवर भरोसा नाय का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालेली आहे. Harshvardhan Patil Appeals Devendra Fadnavis for Indapur Assembly.

बारामती लोकसभा मतदारसंघातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवारांची Sunetra Pawar उमेदवारी निश्चित होताच महायुतीतील नेत्यांनी बंडाचे निशाण फडणकावण्याचा प्रयत्न केला. यातून पुढे मोठी दरी निर्माण होऊन त्याचे रूपांतर पराभवात होऊ नये, म्हणून खु्द्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भाजपसह शिंदे गटातील नाराजांना शांत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यातून फडणवीसांनी इंदापूरमधील Indapur भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यावेळी हर्षवर्धन पाटलांनी पुन्हा एकदा अप्रत्यक्षपणे अजित पवारांच्या कार्यपद्धतीवर विश्वास नसल्याचेच स्पष्ट केले आहे.

Ajit Pawar, Devendra Fadnavis, Harshvardhan Patil
Baramati Lok Sabha Constituency : हर्षवर्धन पाटलांची नेमकी सल काय? फडणवीसांसमोरच बोलून दाखवली

हर्षवर्धन पाटील Harshavardhan Patil म्हणाले, यापूर्वी बारामती लोकसभेचे काम करूनही विधानसभा निवडणुकीत काय घडले, याची जाण सर्वांना आहे. तालु्क्यातील सर्व प्रश्नांबाबत आपण अजित पवारांच्या उपस्थितच चर्चा केलेली आहे. मात्र, सध्या तालु्क्यातील भाजप BJP कार्यकर्त्यांवर खूप अन्याय होत आहे. मात्र, तुमच्या सूचनेनुसार महायुतीच्या उमेदवाराला इंदापूर भाजपकडून सर्व सहकार्य केले जाईल. मात्र, इंदापूर तालुक्यातील भाजपचे पालकत्व फक्त तुम्हीच स्वीकारावे. या तालुक्यावर भविष्यात अन्याय होणार नाही, याची खबरदारी घ्यावी, असे साकडेच पाटलांनी फडणवीसांना भर सभेत घातले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पाटलांच्या भाषणादरम्यान उपस्थित कार्यकर्त्यांना विधानसभेचे काय, असे जोरात ओरडून सांगितले. यावर मात्र पाटलांनी आता थांबा, विधानसभेचे विधानसभेवेळीच पाहून घेऊ, असे म्हणत हा विषय टाळला. तसेच गतवेळी आपला निसटता पराभव झाला आहे. मात्र, आम्ही खचलो नाही. येणारा काळ आपला आहे. त्यामुळे इंदापूरमध्ये विधानसभेत भाजपचा झेंडा फडकावल्याशिवाय राहणार नाही, असे अाश्वासनही फडणवीसांना दिला. यापूर्वी मात्र अंकिता पाटलांनी Ankita Patil आधी विधानसभेचा शब्द द्या नंतरच लोकसभेचे काम करू, असे जाहीर करत थेट अजित पवारांनाच इशारा दिला होता.

(Edited by Sunil Dhumal)

R

Ajit Pawar, Devendra Fadnavis, Harshvardhan Patil
Loksabha Election 2024 : उमेदवार बदलूनही 'वंचित' निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर, उमेदवाराचा अर्ज बाद...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com