Prabhakar Deshmukh
Prabhakar Deshmukh dahiwadi reporter
पश्चिम महाराष्ट्र

प्रभाकर देशमुख ठरवणार दहिवडीचा नगराध्यक्ष..!

रूपेश कदम

दहिवडी : दहिवडी नगरपंचायतीचा नगराध्यक्ष कोण होणार हे माण-खटावचे राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख ठरवणार असून चमत्कारावर अवलंबून असलेले भाजप, शिवसेना सुध्दा नशीब अजमावण्याची शक्यता आहे. चार फेब्रुवारी रोजी कोण कोण अर्ज भरणार, बिनविरोध की मतदानाने नगराध्यक्ष निवडला जाणार याचीच चर्चा रंगू लागली आहे.

अतिशय चुरशीने लढल्या गेलेल्या दहिवडी नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीने आठ जागा निर्विवाद वर्चस्व मिळवले आहे. भाजपला पाच तर शिवसेनाला तीन जागा मिळाल्या. एक अपक्ष नगरसेवक निवडून आला. निकालानंतर अपक्ष नगरसेवक राष्ट्रवादीच्या गुलालात रंगला व त्यांने राष्ट्रवादीशी संधान बांधले. यानंतर अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. सध्या राष्ट्रवादी नऊ, भाजप पाच व शिवसेना तीन असेल बलाबल झाले.

नगराध्यक्षपदाचे आरक्षण सर्वसाधारण पडल्याने अनेकांच्या आशा-आकांक्षाना धुमारे फुटले. राष्ट्रवादी अंतर्गत मोठ्या प्रमाणात लॉबिंग सुरू झाले. सर्वसाधारण महिला आरक्षण पडले असते तर निलिमा पोळ व वर्षाराणी सावंत यांच्यात रस्सीखेच झाली असती. परंतू, महिला आरक्षण नसल्यामुळे पुरुषालाच संधी द्यावी, असा एक मतप्रवाह पक्षांतर्गत जोर धरू लागला आहे. त्यानुसार सध्या सागर पोळ, महेश जाधव व सुरेंद्र मोरे यांच्या समर्थकांनी सुरुवातीला नगराध्यक्ष पद आपल्यालाच मिळावे म्हणून जोर लावला आहे.

हे तीनही उमेदवार तरुण, तडफदार व कार्यकर्त्यांचा मोठा पाठिंबा असलेले आहेत. त्यामुळे कोणाला संधी मिळणार याबद्दल आडाखे बांधले जावू लागले आहेत. अशा परिस्थितीत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना विरोधकांनी मोठी आमिषे दाखवण्यात येत आहेत. राष्ट्रवादीतील अंतर्गत धुसफूसीचा फायदा भाजपचे धनाजी जाधव व शिवसेनेच्या सुरेखा पखाले घेण्याची शक्यता आहे. या सर्व शक्यता पाहता नगराध्यक्ष पदासाठी कोण मैदानात उतरणार याची उत्सुकता आहे.

नगराध्यक्ष पदाच्या गुंत्यावर रामबाण उपाय प्रभाकर देशमुख काढतील, अशी खात्री निष्ठावंतांना आहे. कारण ज्या पद्धतीने प्रभाकर देशमुख यांनी नगरपंचायत निवडणुकीत रणनीती आखली. आणी त्यानंतरही त्यांनी अपक्ष नगरसेवकाला सोबत घेण्यासाठी जे डावपेच रचले. ते पाहता नगराध्यक्ष पदाचा तिडासुध्दा ते लिलया सोडवून माण राष्ट्रवादीत माझाच शब्द अंतिम असेल, असा संदेश देतील याचा विश्वास कार्यकर्त्यांना आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT