Rohit Pawar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Rohit Pawar: युवा संघर्ष यात्रेतच MCAचे अध्यक्ष रोहित पवार पाहणार फायनल मॅच..

Cricket World Cup final 2023:रोहित पवार भारत-ऑस्ट्रेलिया फायनल मॅच संघर्ष यात्रे दरम्यान वाटेवर पाहणार आहेत.

राजेंद्र त्रिमुखे

Ahmednagar: कर्जत-जामखेडचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची सध्या युवा संघर्ष यात्रा सुरू आहे. रोहित पवार हे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सुद्धा आहेत. त्यामुळे अर्थातच त्यांनी अंतिम सामान्यासाठी अहमदाबादला उपस्थिती अपेक्षित होती. मात्र त्यांच्या युवा संघर्ष पडयात्रेचा दुसरा टप्पा सुरू असल्याने ते अंतिम मॅचसाठी अहमदाबादला गेले नाहीत. असे असले तरी क्रिकेटचे चाहते असलेले रोहित पवार भारत-ऑस्ट्रेलिया फायनल मॅच संघर्ष यात्रे दरम्यान वाटेवर पाहणार आहेत.

उपांत्य सामना भारत-न्यूजीलंड यांच्यात मुंबईत झाला. त्याला महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष असलेले रोहित पवार उपस्थित राहिले नव्हते. याबाबत त्यांना कर्जत मध्ये 'सरकारनामा'ने बोलते केले होते. संघर्ष यात्रा, दीपावली सण आणि चौंडी येथे आयोजित विविध विकासकामांच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाच्या व्यग्रतेमुळे त्यांना उपांत्य सामन्याला उपस्थिती देता आली नव्हती.

मात्र त्याच वेळी रोहित पवार यांनी 'सरकारनामा'शी बोलताना 19 तारखेला अंतिम सामना असून आपण संघर्ष यात्रेत असलो तरी मी क्रिकेटचा लहानपणापासून मोठा चाहता आहे. त्यामुळे आपण संघर्ष यात्रेतील सहकारी,नागरिकांसह ज्या ठिकाणी असू तिथे मोठे स्क्रीन लावून पूर्ण मॅच पाहणार असल्याची माहिती दिली होती. याबाबत रोहित पवार यांच्या यंत्रणेकडून आज रविवारी रोहित पवार फायनल मॅच बीड जिल्ह्यातील नायगाव जवळ राजोरी येथे पाहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

((राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

रोहित पवार यांच्या युवा संघर्ष पदयात्रेचा दुसऱ्या टप्यातील आज चौथा दिवस आहे. यात्रा काल रात्री नगर जिल्ह्यातून बीड जिल्ह्यात पोहचली आहे. आज सकाळी यात्रेचा प्रारंभ पाटोदा येथून सुरू होऊन दुपारी यात्रा थेरला फाटा इथे तर यात्रेची आजची समाप्ती नायगाव मयूर इथे होणार आहे. या दरम्यान शक्यतो नायगाव जवळ राजुरी इथे मोठ्या एलईडी स्क्रीनवर रोहित पवार आणि यात्रेतील सोबती स्थानिक नागरिकांसह अंतिमनक्रिकेट मॅचचा आनंद घेणार असल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान रोहित पवार यात्रेदरम्यान रोज सकाळी यात्रा प्रारंभ होण्यापूर्वी सहकार्यांसोबत योगाचा व्यायाम करतात. त्याचबरोबर अनेक ठिकाणी सकाळी ते क्रिकेट खेळतात. वाटेमध्ये कुठे मूले क्रिकेट खेळत असतील तर त्या ठिकाणी थांबून स्वतः बॅट हातात घेऊन बॅटिंगचा आनंदही रोहित पवार घेताना दिसून येत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT