Dhangar Reservation: धनगर समाज आक्रमक; हिवाळी अधिवेशनात मोर्चा धडकणार

Nagpur Winter Session : धनगर समाजाने आजपासून (रविवार) महाराष्ट्रभर दौरा केला जाणार आहे.
Dhangar Reservation
Dhangar Reservation Sarkarnama

Parbhani: एस टी प्रवर्गामधील आरक्षणाच्या मागणीसाठी आता धनगर समाज आक्रमक झाला आहे. येणाऱ्या 11 डिसेंबर रोजी नागपूर अधिवेशनावर एल्गार मोर्चा काढण्याचा निर्णय धनगर समाजाने घेतला आहे. यासाठी परभणीमध्ये सकल धनगर समाजाने पत्रकार परिषद घेऊन याची माहिती दिली.

धनगर समाजाने आजपासून (रविवार) महाराष्ट्रभर दौरा केला जाणार आहे. जास्तीत जास्त धनगर बांधवांनी या मोर्चासाठी नागपूर येथे दाखल व्हावं, असे आव्हान मोर्चाच्या आयोजकांकडून करण्यात आले आहे.

((राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Dhangar Reservation
Dhangar Reservation : यशवंत सेना धनगर नेत्यांवर संतप्त! एसटी आरक्षण अंमलबजावणीवर शब्दही काढला नाही

मराठा आरक्षणाला ओबीसींचा विरोध, धनगर आरक्षणाच्या मागणीकडे होणारे दुर्लक्ष, यामुळे राज्याचे वातावरण ढवळून निघाले आहे. यातच अंबड येथे ओबीसी आरक्षण बचाव महाएल्गार सभा पार पडली. यावेळी ओबीसी नेत्यांनी मनोज जरांगेंच्या मागणीला जोरदार विरोध केला. मात्र, या व्यासपीठावर उपस्थित धनगर नेत्यांनी समाजाच्या एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीबाबत चकार शब्दही काढला नाही. परिणामी यशवंत सेनेसह समाजाने संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत.

एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीबाबत दिलेली ५० दिवसांची मुदत संपली तरी सरकारने ठोस निर्णय घेतला नाही. यामुळे यशवंत सेनेच्या नगरमधील चौंडी येथे पुन्हा बेमुदत उपोषण सुरू केले आहे.आरक्षणाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत बारामती येथेही धनगर समाजाच्या वतीने आंदोलन सुरू करण्यात आले आहे. धनगरांच्या मागणीकडे सरकार डोळेझाक करत असतानाही मिळालेल्या ओबीसींच्या मोठ्या व्यासपीठावर उपस्थित असूनही आपल्या नेत्यांनी एकही शब्द काढला नाही. याचा यशवंत सेनेच्या वतीने तीव्र संताप व्यक्त केला आहे.

Dhangar Reservation
Bachchhu Kadu On Sugar Factory : ऊस कारखानदारांना दणका देण्यासाठी आता बच्चू कडू नगरच्या साखरपट्ट्यात...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com