Shambhuraj Desai News Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Shambhuraj Desai News: ''आमचं 'टार्गेट' सेट,पण अजित पवारांसारखा मोठा नेता...''; देसाईंचं मोठं विधान

Shambhuraj Desai says we will welcome Ajit Pawar: ...तर आम्ही त्यांचं स्वागतच करू!

सरकारनामा ब्यूरो

Satara News : एकीकडे सत्ताधारी शिंदे फडणवीस सरकार आणि विरोधकांमधील आरोप प्रत्यारोपांच्या फैरींनी राजकारण तापलं आहे. महाराष्ट्राच्या राज्याच्या राजकारणात खळबळजनक दावे प्रतिदावे देखील करण्यात येत आहे. याचदरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार हे मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसवर नाराज असून ते लवकरच भाजपात दाखल होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

यादरम्यान पवारांच्या भाजपप्रवेशावर राजकीय वर्तुळातून उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. याचवेळी मंत्री व शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई यांनी मोठं विधान केलं आहे.

भाजपा नेते आणि शिवसेनेच्या शिंदे गटातील आमदार सातत्याने अजित पवारांबाबत वेगवेगळी वक्तव्ये करत आहेत. यातच शंभूराज देसाई(Shambhuraj Desai) यांनी अजित पवारांविषयी सूचक वक्तव्य केलं आहे. देसाई म्हणाले, आम्ही महायुती म्हणून आगामी विधानसभा निवडणूक २०२४ साठीचं लक्ष्य तयार केलं आहे. आम्हाला २०० पेक्षा जास्त जागा जिंकायच्या आहेत.

या जागा २०० पेक्षा जास्त, २२५ किंवा २५० करण्यासाठी कोणी आम्हांला मदत करणार असेल, अधिक जागा निवडून आणण्यासाठी पाठिंबा देणार असेल, आमच्या महायुतीत भर पडून ती मोठी होणार असेल तर आम्ही त्यांचं स्वागतच करू. सध्या आम्ही २०० आमदार निवडून आणण्याचं लक्ष्य ठेवलं आहे.

आमचं टार्गेट सेट...

भाजप आणि आमचं २०० प्लस जागा जिंकण्याचं टार्गेट सेट आहे. त्यात अजित पवारांसारखं कोणी येत असेल तर त्यांचं स्वागतच आहे. भाजपा, शिवसेना, आरपीआय, इतर मित्रपक्ष आणि अपक्ष अशी आमची महायुती आहे. ही महायुती अधिक भक्कम करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. यात आणखी कोण येणार असेल तर त्यांचं स्वागतच आहे.

अजितदादांचे अचानक दौरे रद्द आणि....

विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते अजित पवार यांनी आज दिवसभरातील आपला संपूर्ण दौरा रद्द केला आहे. पुणे जिल्ह्यात अजित पवार यांचे आज चार ठिकाणी कार्यक्रम होते. ते रद्द करण्यात आले आहे. दौरा रद्द करण्याचे कारण अद्याप समजलेले नाही. त्यामुळे अजित पवारां(Ajit Pawar)नी हा दौरा का रद्द केला, ते कुठे गेले, याबाबत राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

पुरंदर येथे आज राष्ट्रवादी काँग्रेस(NCP)कडून शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे उपस्थित आहेत. अजित पवार हेही या कार्यक्रमास उपस्थित राहणार होते. या दौऱ्याचे फलक ठिकठिकाणी लावण्यात आले आहे. तसेच वडकी येथील एका कार्यक्रमास ते उपस्थित राहणार होते. मात्र, अचानक हे कार्यक्रम रद्द केल्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT