Ajit Pawar News: अजितदादांच्या मनात नक्की चाललयं काय ?; दौरा रद्द, राजकीय चर्चांना उधाण

Pune Purandar Shetkari Melava: अजित पवार कुठे गेले ?
Ajit Pawar
Ajit Pawarsarkarnama

Maharashtra Politics: विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते अजित पवार यांनी आज दिवसभरातील आपला संपूर्ण दौरा रद्द केला आहे. पुणे जिल्ह्यात अजित पवार यांचे आज चार ठिकाणी कार्यक्रम होते. ते रद्द करण्यात आले आहे. दौरा रद्द करण्याचे कारण अद्याप समजलेले नाही. त्यामुळे अजित पवारांनी हा दौरा का रद्द केला, ते कुठे गेले, याबाबत राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

पुरंदर येथे आज राष्ट्रवादी काँग्रेसकडून शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे उपस्थित आहेत. अजित पवार हेही या कार्यक्रमास उपस्थित राहणार होते. या दौऱ्याचे फलक ठिकठिकाणी लावण्यात आले आहे. तसेच वडकी येथील एका कार्यक्रमास ते उपस्थित राहणार होते.

Ajit Pawar
Ajit Pawar News : छत्रपती संभाजीनगरच्या सभेत फडणवीसांबाबत दिलेला शब्द अजितदादांनी पाळला नाही...

गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात मोठ्या घटना घडत आहेत. यात 'द न्यू इंडियन एक्स्प्रेस'ने दिलेल्या वृत्तामुळे खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पायउतार होणार असून राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून अजित पवार (Ajit Pawar) हे सूत्रे हाती घेणार असल्याचे वृत्त 'द न्यू इंडियन एक्स्प्रेस'ने दिले आहे.

भाजप आणि अजित पवार यांच्या नेतृत्वातील सत्ता स्थापनेचा 2019 मध्ये प्रयोग फसला होता. हा प्रयोग पुन्हा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 'द न्यू इंडियन एक्स्प्रेस'ने दिलेल्या वृत्तानुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या डोक्यावर अपात्रतेची टांगती तलवार आहे.

Ajit Pawar
Supreme Court News : राज्यपाल नियुक्त आमदारांची नियुक्ती होणार ? आज सुनावणी

सुप्रीम कोर्टाचा निर्णय येत्या काही दिवसात येण्याची शक्यता आहे. तर, दुसरीकडे अजित पवार यांना राज्याचे मुख्यमंत्री होण्याची घाई असल्याचे वृत्तात म्हटले आहे. दरम्यान, आज (सोमवारी) भाजपचे काही नेते दिल्लीत पक्षश्रेष्ठींना भेटण्यासाठी गेले आहेत.

अजित पवार यांनी काल (रविवारी) नवी मुंबई येथील रुग्णालयात जाऊन उष्माघातामुळे उपचार घेणाऱ्या रुग्णांना भेट दिली. महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात अनेक भाविकांना उष्माघाताचा फटका बसला. या घटनेत १२ जण दगावले आहेत.

(Edited By Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com