Kolhapur News :  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur Politics : ऐन दिवाळीत मंत्री मुश्रीफांच्या मुखात खर्डा-भाकर; कारण काय?

Kolhapur News : कागल तालुक्यातील महिलांनी खर्डा भाकरी देऊन ओवाळणी केली.

Rahul Gadkar

Kolhapur News : गेल्या दीड महिन्यापासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ऊसदर आणि मागील हंगामातील 400 रुपये दरावरून आंदोलन सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्यात हे आंदोलन चिघळले असूनही कारखानदार आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कारखानदारांना दिवाळीचा फराळ म्हणून खर्डा भाकरी चारून निषेध व्यक्त करण्यात येणार आहे. (Latest Marathi News)

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सरकार व कारखानदारांनी वाऱ्यावर सोडले आहे. आंदोलनात तोडगा न काढल्याने शेतकऱ्यांची दिवाळी रस्त्यावर गेली. यामुळे दीपावली - भाऊबीजनिमित्त स्वाभिमानी महिला आघाडीच्या वतीने आमदार, खासदार लोकप्रतिनिधींना खर्डा भाकरी देऊन ओवाळणी करण्यात आली. कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री, वैद्यकीय शिक्षणमंत्री, हसन मुश्रीफ यांना कागल तालुक्यातील महिलांनी खर्डा भाकरी देऊन ओवाळणी केली.

दरम्यान, गेल्या दीड महिन्यापासून कारखानदार आणि सरकार या मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे. कोणताही ठोस मार्ग होत नसल्याने आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाची पुढील दिशा ठरणार आहे. सायंकाळी सहा वाजता हुपरी येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी हे आंदोलनाच्या पुढील टप्प्याची घोषणा करणार आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना ' चलो हुपरी' असा संदेश दिला आहे. तर सायंकाळी चार वाजता जयसिंगपूर येथील विक्रमसिंह राजे मैदानावरून दुचाकी रॅली निघणार आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT