Raju Shetty : राजू शेट्टींनी केलं अजित पवारांचे कौतुक; 'माळेगाव' प्रशासनाचा 'स्वाभिमानी'कडून सन्मान

Swabhimani Shetkari Sanghatana : राजू शेट्टी यांनी जयसिंगपूर येथील ऊस परिषदमध्ये अजित पवारांचे कौतुक केलं आहे.
Raju Shetty, Ajit Pawar
Raju Shetty, Ajit PawarSarkarnama

Malegaon News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या माळेगाव साखर कारखान्याने राज्यात प्रथम क्रमांकाचा ऊसदर दिल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने माळेगावच्या प्रशासनाचा सन्मान केला आहे.

माळेगाव कारखाना अधिकचा रिकव्हरी झोन असलेल्या कोल्हापूर, सांगली, सातारा भागाच्या तुलनेत अजित पवारांच्या माळेगाव, सोमेश्वर कारखान्यांनी गतवर्षीच्या उसाला राज्यात उच्चांकी ऊसदर दिला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी जयसिंगपूर येथील ऊस परिषदमध्ये अजित पवारांचे कौतुक केलं आहे.

Raju Shetty, Ajit Pawar
Sanjeev Thakur: ललित पाटील प्रकरण भोवलं; 'ससून'चे डीन संजीव ठाकूर यांची उचलबांगडी

"उपमुख्यमंत्री पवार यांचे मार्गदर्शन घ्या आणि कोल्हापूर, सांगली, सातारा भागातील कारखांदारांनी कमी दिलेले प्रतिटन दोनशे ते अडीचशे रुपये शेतकऱ्यांना द्यावेत, अशी आग्रही मागणी राजू शेट्टी यांनी लावून धरली आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष राजेंद्र ढवाण, जिल्हाध्यक्ष कल्याण भगत उपस्थित होते. या वेळी शेतकरी संघटनेच्या संबंधित पदाधिकाऱ्यांनी माळेगावच्या संचालक मंडळाचा जाहीर सत्कार करून शेट्टी यांच्या मागणीला पाठिंबा दिला आहे.

राजेंद्र ढवाण म्हणाले,"अजितदादा हे सहकाराचे पुरस्कर्ते आहेत, हे माळेगाव व सोमेश्वरने उच्चांकी दर दिल्यावरून स्पष्ट होते. त्यामुळेच खासदार राजू शेट्टी यांनी कोल्हापूर, सातारा भागातील कारखानदारांना अजितदादांचे मार्गदर्शन घेण्याची विनंती केली आहे. शेतकऱ्यांना खर्चाच्या तुलनेत अधिकचे दोन पैसे मिळवून देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमकपणे प्रयत्न करीत असते,"

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com