Hasan Mushrif News : Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Hasan Mushrif News : सिकंदरची गदा मुश्रीफांच्या खांद्यावर, विरोधात मल्लं कोण?

Hasan Mushrif News : सिकंदर शेखकडून खांद्यावर ठेवलेली गदा मंत्री मुश्रीफ यांनी मागून घेतली...

Rahul Gadkar

Hasan Mushrif News : कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज महाराष्ट्र केसरी विजेता सिकंदर शेख यांचा सत्कार केला. या सत्कार वेळी मंत्री मुश्रीफ यांनी डौलात केलेली एन्ट्री चर्चेचा विषय ठरली. सत्कार संपन्न झाल्यानंतर फोटो सेशनला जात असताना मंत्री मुश्रीफ यांनी सिकंदर यांची गदा आपल्या खांद्यावर घेऊन डौलात चाल केली. (Latest Marathi News)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कुस्ती पंढरी कोल्हापुरातील गंगावेस तालमीचा पैलवान सिंकदर शेखने अवघ्या साडे पाच सेकंदात ६६ व्या महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला. अंतिम फेरीच्या लढतीत सिकंदरने प्रतिस्पर्धी शिवराज राक्षेला २२ सेकंदाला झोळी डावावर चितपट केले. त्याचे राज्यभरातून कौतुक होत असताना मंत्री मुश्रीफ यांनी कोल्हापूर राष्ट्रवादी कडून त्याचा सत्कार केला. राष्ट्रवादीकडून मंत्री मुश्रीफ यांनी सिकंदरला शुभेच्छा देत अडीच लाखांचा धनादेश सुपूर्त केला.

कोल्हापूरच्या कुस्ती पंढरीत अनेक मल्लांनी आपली कला सिद्ध केलेली आहे. कोल्हापूरच्या लाल मातीत घडलेल्या सिकंदर यांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला आहे. यापुढेही त्याने हिंदकेसरी किताब पटकवण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा शुभेच्छा मंत्री मुश्रीफ यांनी दिल्या.

सत्कार समारंभ संपल्यानंतर फोटो सेशनसाठी सर्वांना हॉल बाहेर जाण्यास सांगितले. या वेळी मंत्री मुश्रीफ यांचा अनोखा ढंग पाहायला मिळाला. सिकंदर शेखकडून खांद्यावर ठेवलेली गदा मंत्री मुश्रीफ यांनी मागून घेतली. आणि स्वतःच्या खांद्यावर ठेवत ऐटीत हॉलमधून बाहेर आले. या वेळी कार्यकर्त्यांनी साहेब विरोधातील मल्ल कोण? असे विचारल्यानंतर मुश्रीफ यांनी स्मित हास्य करून कार्यकर्त्यांना इशारा दिला.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT