Kolhapur Politics : मुश्रीफ यांचा सतेज पाटील यांना चिमटा, ‘पाणी योजनेचे श्रेय कोणा एकाचे नाही’

Mushrif Criticized Satej Patil : मुश्रीफ म्हणतात, अजित पवारांमुळे पाइपलाइन योजनेचे काम निधीअभावी एकदाही थांबले नाही.
Hasan Mushrif & Satej Patil
Hasan Mushrif & Satej PatilSarkarnama
Published on
Updated on

Hasan Mushrif v/s Satej Patil : कोल्हापूर शहराच्या थेट पाइपलाइनची योजना पूर्णत्वास गेल्याने आता या योजनेचे श्रेय घेण्यावरून राजकारण रंगले आहे. त्यामुळे राजकीय नेते एकमेकांवर आरोप करू लागल्याचे चित्र आहे. (NCP Minister Hasan mushrif Indirectly given credit to Ajit Pawar of Kolhapur Water scheme)

कोल्हापूर शहरासाठी थेट पाइपलाइन योजनेद्वारे पिण्याचे पाणी (Water) मिळणार आहे. याबाबत काँग्रेसचे नेते (Congress) सतेज पाटील यांनी जलपूजन करीत त्याचा आनंद साजरा केला होता. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे (NCP) मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी टीका केली आहे.

Hasan Mushrif & Satej Patil
Maharashtra Politics : राधाकृष्ण विखे यांनी बाळासाहेब थोरात यांना चांगलेच सुनावले!

कोल्हापूर शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न नवा नाही. गेली अनेक वर्षे त्यावर चर्चा व राजकरण सुरू होते. याबाबत काँग्रेसचे महापौर रामभाऊ फाळके यांनी हा प्रतिष्ठेचा प्रश्न केला होता. या विषयावर त्यांनी राजीनामादेखील दिला होता.

यासंदर्भात काँग्रेसचे नेते सतज पाटीव दोन वेळा मंत्री होते. त्यांनी यासंदर्भात पाठपुरावा केला होता. दीर्घकाळ त्यांनी पत्रव्यवहारदेखील केला होता. कळम्मावाडी धरणातून थेट पाइपलाइनची ही योजना अनेक वर्षे रेंगाळल्यानंतर अखेर आता पूर्ण झाली झाली. पाइपलाइनच्या चाचणीत पाणी आल्याने आता त्यावर श्रेयवादाचे राजकारण सुरू झाले आहे.

यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) हसन मुश्रीफ यांनी थेट पाइपलाइनच्या कामाचे श्रेय एकाचे नाही, असे विधान केले आहे. ते म्हणाले, काळम्मावाडी धरणातील थेट पाइपलाइनचे पाणी दिवाळीत आले. मी पालकमंत्री असताना हे पाणी मिळाल्याने माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. या पाण्याचे श्रेय कोणा एका व्यक्तीचे नाही, सर्व यश कोल्हापूरच्या जनतेचे आहे.

Hasan Mushrif & Satej Patil
Amravati Congress : काम थांबल्यानं वरुडात संतापाचे वारे; आमदार कमिशनखोर असल्याचे काँग्रेसचे नारे

ते म्हणाले, अजित पवार यांचे खास आभार मानले पाहिजे, कारण त्यांनी तत्काळ पैसा दिलेला होता. या योजनेचे काम निधीअभावी कधीही बंद पडलं नाही. आमची राजकीय भूमिका बदलली आहे. त्यामुळे त्यांना वाटलं असेल की, आम्ही याचं श्रेय घेऊ म्हणून आमदार सतेज पाटील यांनी श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते याचा लोकार्पण सोहळा करण्यात येणार असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी स्पष्ट केले. या योजनेत कोणताही भ्रष्टाचार झाला नाही, पण तसं वाटत असेल तर चौकशी करू.

Hasan Mushrif & Satej Patil
Rohit Pawar : 'पवार'जे बोलतात तेच करतात; रोहित म्हणाले, 'यंदाची दिवाळी बारामतीत नव्हे तर...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com