Udayanraje Bhosale : shambhuraj desai sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Shambhuraj Desai Meet Udayanraje : राज्याचे मंत्री देसाईंनी घेतली उदयनराजेंची भेट; मराठा आरक्षणावर चर्चा..

Chetan Zadpe

Satara News : जालन्यातील आंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षण आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. यामुळे राज्याचं राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. विरोधकांकडून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला जात आहे. जागोजागी आंदोलनं होत आहेत. हाच सरकारविरोधातला तीव्र असंतोष कमी होण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत, त्याचाच एक भाग म्हणून राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. (Latest Marathi News)

'मराठा आरक्षणाबाबत शासनाची भूमिका आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरू असलेल्या सुनावणी बाबत माहिती देण्यासाठी मराठा आरक्षण समिती सदस्य या नात्याने उदयनराजे यांची भेट घेतल्याचे देसाईंनी सांगितले. यावेळी देसाई व खासदार उदयनराजे भोसले यांच्यामध्ये सविस्तर चर्चा झाली. त्यामध्ये देसाई यांनी न्यायालयामध्ये सुरू असलेली प्रक्रिया या विषयी माहिती दिली. तसेच आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजला देण्यात येणाऱ्या सवलती याबाबतही सविस्तर माहिती दिली.

यावेळी मराठा समाजाने शांतता राखावी, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये व आरक्षणाच्या संदर्भात शासनास सहकार्य करावे, असे आवाहनही पालकमंत्री शंभुराज देसाई व खासदार उदयनराजे भोसले यांनी केले. यावेळी सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, पोलीस अधीक्षक समीर शेख उपस्थित -

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT