Sanjay Raut On Jalna Protest : मराठा आंदोलकांवर लाठीमार करण्याचा आदेश देणारा मंत्रालयातून आलेला फोन कुणाचा ? राऊतांचा सवाल !

Sanjay Raut On Jalna Maratha Samaj Protest : "मराठा समाजाचं आंदोलन चिरडून टाकायचं होतं..."
Sanjay Raut On Jalna Maratha Samaj Protest
Sanjay Raut On Jalna Maratha Samaj ProtestSarkarnama

Mumbai News : जालन्यातील आंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षण आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. यामुळे राज्याचं राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. विरोधकांकडून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला जात आहे. जागोजागी आंदोलनं होत आहेत. यावर आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सरकारवर हल्लाबोल करतानाच, लाठीमाराचा आदेश देण्यासाठी मंत्रालयातून एक अदृश्य फोन पोलिसांना आल्याचा, खळबळजनक दावा केला आहे. (Latest Marathi News)

Sanjay Raut On Jalna Maratha Samaj Protest
Jalna Maratha Andolan : लोकशाहीचा 'जालियानवाला बाग ते जालना' प्रवास; राष्ट्रवादीचा सरकारवर हल्लाबोल

संजय राऊत म्हणाले, "शांतपणे उपोषण सुरू होतं. यामध्ये सरकारने चिडावं असं काय झालं? यांना मराठा समाजाचं आंदोलन चिरडून टाकायचं होतं. मंत्रालयातून पोलिसांना एक अदृश्य फोन आला. हा फोन कुणाचा होता? तो गृहमंत्र्यांचा होता, मुख्यमंत्र्यांचा होता, उपमुख्यमंत्र्यांचा होता की दिल्लीतून आला होता? हे स्पष्ट झालं पाहिजे. फोनवरून आदेश दिल्यानंतर पोलिसांनी निर्घृण लाठीमार केला. महिला-गृहिणी यांच्यावर गोळ्या घालण्याचा प्रयत्न केला गेला. शाळकरी मुलांवर लाठीमार झाला," असा खळबळजनक आरोप राऊतांनी केला आहे.

उद्धव ठाकरेंची जखमी आंदोलकांना भेट -

जालन्यातील अंबड तालुक्यातील आंतरवली सराटी गावात चार दिवसांपासून मराठा समाजाच्या वतीने आरक्षण आणि इतर मागण्यांसाठी आंदोलन सुरू होते. या आंदोलकांवर अचानकच शुक्रवारी सायंकाळी पोलिसांनी लाठीहल्ला केला. यात ३५० हून अधिक आंदोलक तर सुमारे ३५ पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. या प्रकाराला सरकार जबाबदार असल्याचा विरोधकांनी आरोप केले. जखमी आंदोलकांची शनिवारी दिवसभर खासदार शरद पवार, उदयनराजे भोसले, छत्रपती संभाजीराजे यांनी भेट घेऊन विचारपूस केली. यानंतर रात्री उशिरा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आंदोलनस्थाळाला भेट दिली.

Sanjay Raut On Jalna Maratha Samaj Protest
Rohit Pawar On NCP Crisis : राष्ट्रवादीत वाढतेय रोहित पवारांची 'पॉवर'; विरोधी नेत्यांसोबत भेटीगाठी, सुळेंनी केले 'राष्ट्रीय प्रमोशन' ?

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले,"महाविकास आघाडीचे सरकार असतानाही मराठा समाजाचे आरक्षणासाठी आंदोलन सुरू होते. आझाद मैदानवरही आंदोलन झाले. त्यावेळी हेच पोलीस होते, मात्र आंदोलकांवर लाठ्या चालल्या नाहीत. हे सरकार निर्घृण आहे, त्यांना याची किंमत चुकवावी लागेल. आता आंदोलकांनी असा काय गुन्हा की सरकारने त्यांच्यावर गोळ्या चालवल्या. यापुढे जर येथील लोकांच्या केसाला धक्का लागला तर अख्खा महाराष्ट्र येथे आणून बसवेल. आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेतले पाहिजे."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com