Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Vikhe : विश्‍वासघात झाला की थोरातांच्या संमतीने अपक्ष उमेदवारी केली? मंत्री विखे-पाटलांचे प्रश्‍नचिन्ह

प्रमोद बोडके

सोलापूर : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत तांबे कुटुंबियांनी घेतलेल्या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. तांबे कुटुंबियांनी घेतलेली भूमिका ही अनपेक्षित आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसच्या नेत्यांनी व्यक्त केली. असे असतानाच या घडामोडींवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील प्रतिक्रिया देत बाळासाहेब थोरातांना टोला लगावला आहे.

''विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदार संघात उमेदवारीबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले म्हणतात विश्‍वासघात झाला. पटोले यांनी आरोप करण्यापूर्वी माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांना विचारावे, विश्‍वासघात झाला की संमतीने अपक्ष उमेदवारी दाखल केली.''

''सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीला बाळासाहेब थोरात यांचे समर्थन आहे का? हा माझा प्रश्‍न आहे. नाना पटोले यांना त्यांच्या प्रश्‍नाचे उत्तर बाळासाहेब थोरातच देऊ शकतात'', असा टोला राधाकृष्ण विखे-पाटील यांनी लगावला.

सोलापूरच्या दौऱ्यावर असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, ''सत्यजित तांबे यांनी अपक्ष उभा राहण्याचा निर्णय घेतला तो स्वत: घेतला की काँग्रेस पक्षाने घेतला? हे शोधावे. भाजपने जर सत्यजीत तांबे यांना समर्थन देण्याचा निर्णय घेतला तर आम्ही त्या निर्णयाचे स्वागतच करु'', अशी भूमिका देखील राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मांडली.

''नगर जिल्ह्यात भाजपची क्षमता पूर्वीपासूनच चांगली आहे. त्यामुळे सत्यजित तांबे भाजपमध्ये आल्यास फार काही फरक पडणार नाही. पक्षात कोणी यावे, कोणी येऊ नये, अशी काही बंधने नाहीत. तांबे यांच्या संघटनशक्तीचा थोडा फरक होईल. पक्ष वाढीसाठी चांगले लोक पक्षात घेण्याचा प्रयत्न वरिष्ठ करतात. आम्ही त्याचे स्वागत करतो '', असे विखे-पाटील यांनी सांगितले.

''मी काँग्रेसमध्ये नसल्याने सध्या काँग्रेसमध्ये किती गट आहेत हे मी नाही सांगू शकत. परंतु काँग्रेसची स्थिती जशी राज्यात आहे तशीच स्थिती देशात आहे. नेत्यांच्या हट्टामुळे काँग्रेसची वाईट स्थिती होत आहे. दोन लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या खासदारांची संख्या ४० च्या पुढे जात नाही '', असा टोलाही विखे-पाटील यांनी लगावला.

सत्यजीत तांबे (Satyajit Tambe) यांनी अपक्ष उमेदवारी जाहीर केल्यानंतर सोशल मिडियावर त्यांचा एक फोटो व्हायरल होत आहे. ज्या मध्ये तांबे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेला काळे फासताना दिसत आहेत. त्या संदर्भात पालकमंत्री विखे-पाटील म्हणाले, ''भाजपने अद्यापही तांबे यांच्या उमेदवारीला पाठींबा दिलेला नाही. ज्या वेळी पाठींबा दिला जाईल त्यावेळी या बाबत चर्चा होईल,, असे विखे-पाटील म्हणाले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT