Satyajeet Tambe यांनी पाठिंबा मागितलेला नाही, ते आल्यास विषय पार्लमेंटरी बोर्डाकडे जाईल !

Nagpur : त्यांना त्यांचे लोक सांभाळता येत नाही. ते दुसऱ्यावर काहीही टीका करतात.
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar BawankuleSarkarnama

Chandrashekhar Bawankule News : नाशिक (Nasik) विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांनी अपक्ष नामांकन दाखल करून राज्याच्या राजकारणात वादळ निर्माण केले. भाजपचा पाठिंबा मागणार असल्याचेही ते बोलले. यावर अजूनही सत्यजीत तांबेंनी आम्हाला पाठिंबा मागितला नाही. आमच्याकडे आले तर आमच्या राज्य आणि केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाकडे हा विषय जाईल, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे आज नागपुरात म्हणाले.

नाना पटोले यांच्याबाबत बोलताना आमदार बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले, त्यांना त्यांचे लोक सांभाळता येत नाही. ते दुसऱ्यावर काहीही टीका करतात. त्यांनी आपलं घर वाचवावं. त्यांचं घर कच्चं झालं आहे. त्यामुळे त्यांच्या केंद्रीय नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभे झाले आहे. देशातल्या आणि महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांना वाटतं काँग्रेस (Congress) हे डुबतं जहाज आहे आणि त्या जहाजावर कुणीही बसायला तयार नाही. २०२४ मध्ये महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांना उमेदवारसुद्धा भेटणार नाही.

कॉंग्रेसचे आमदार अमित देशमुख यांनी म्हटलंय की, मी ज्या घरात आहे त्याच घरात आहे. याबाबत विचारले असता, ते आज बोलले ते आजच्यासाठी ठीक आहे. मात्र काळ ठरवेल. जर तरला राजकारणात काही अर्थ नाही. २०२४ पर्यंत तुम्हाला खूप सारे झटके महाराष्ट्रात दिसतील, एवढे मी सांगू शकतो, असे बावनकुळे म्हणाले. आमच्या तीन उमेदवारांनी फॉर्म भरले. मात्र त्यांना एबी फॉर्म नाही. अपक्षाची लढाई आहे. मात्र समर्थन मागितलं तर आमचं केंद्रीय बोर्ड त्यावर निर्णय करेल, असंही ते म्हणाले..

प्रकाश आंबेडकर काय बोलतात, तो त्यांचा अधिकार आहे. पण त्यांना माझी एक विनंती आहे उद्धव ठाकरेंकडे जाण्यासाठी ते तयार आहेत. उद्धवजींनी आपले स्वतःचे आमदार, खासदार सांभाळले नाही. ते युतीचा धर्म पाळू शकत नाही. कारण त्यांनी ते पाळणे शिकले नाही. ते बाहेरच्या पक्षांना काय सांभाळणार, असा टोला आमदार बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंना हाणला. प्रकाश आंबेडकर प्रगल्भ नेते आहे ते उद्धव ठाकरेंसोबत जाण्याकरता दहा वेळा विचार करतील, असंही ते म्हणाले.

Chandrashekhar Bawankule
भाजप-मनसे युतीबाबत चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...

पंकजा मुंढे भाजपमध्ये नाराज आहेत, असे चंद्रकांत खैरे नुकतेच म्हणाले होते. याबाबत विचारले असता, पंकजाताई अत्यंत खूश आहेत. त्या काम करत आहेत. माझं बोलणं त्यांच्याशी झालं आहे. त्यामुळे कपोलकल्पित वक्तव्य कोणी करू नये. भारतीय जनता पक्षाचा साधा कार्यकर्ताही इतर कोणत्या पक्षात जाणार नाही. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात हा पक्ष चालतो आहे. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस नेतृत्व करत आहेत. आमचा विजय हा पक्ष नेतृत्वाचा आहे. आमच्याकडून कोणीही कुठे जाऊ शकत नाही. पुढच्या पंधरा वर्षे आमची सत्ता बुक आहे, असे बावनकुळे म्हणाले.

अमोल मिटकरी काहीतरी व्हिडिओ एडिट करतात. काहीतरी सांगतात. विरोधी पक्षाने कुठलाही ट्विट केलेल्या व्हिडिओवर विश्वास ठेवू नका जवळपास ७००० लोकांची काल सभा झाली आणि कुठे असं चित्र नव्हतं. तो व्हिडिओ मला बघावा लागेल, असेही बावनकुळे यांनी अमोल मिटकरींनी ट्विट केलेल्या व्हिडिओच्या बाबतीत बोलताना सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com